शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

बुलडाणा : तणाव टाळण्यासाठी ‘ते’ पोस्टर हटवले; भाजप-सेनेतील दरी वाढली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2018 12:12 AM

बुलडाणा : आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतीच केली असतानाच आता शिवसेनेने भाजप विरोधात पोस्टर वॉर सुरू केल्याचे दिसत असतानाच अचानक एक दिवसात बुलडाणा शहरात जवळपास तीन ठिकाणी  भाजप विरोधात लावण्यात आलेले पोस्टर उतरविण्यात आले आहे.

ठळक मुद्देपरवानगीचा मुद्दा ठरणार कळीचा

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतीच केली असतानाच आता शिवसेनेने भाजप विरोधात पोस्टर वॉर सुरू केल्याचे दिसत असतानाच अचानक एक दिवसात बुलडाणा शहरात जवळपास तीन ठिकाणी  भाजप विरोधात लावण्यात आलेले पोस्टर उतरविण्यात आले आहे.‘ही तुमची शिवसेना, हा आपला भाजप’ ही टॅग लाइन घेऊन राज्यात जसे पोस्टर्स शिवसेनेने लावले होते, तसे ते बुलडाण्यातही लावण्यात आले होते;  मात्र अवघ्या एका दिवसात ते हातोहात उतरविण्यात आले. या पोस्टर्सवरून भाजप आणि शिवसेनेत पुन्हा एकदा बुलडाण्यात चांगलीच जुंपते काय, अशी स्थिती निर्माण झाली असताना अचानक जसे हे पोस्टर्स रातोरात लागले, तसे भरदुपारी दोन कार्यकर्त्यांनी हातोहात ही पोस्टर्स उतरविल्याचे प्रत्यक्षदश्रीने सांगितले.या पोस्टर्सवर राज्य परिवहन महामंडळाच्या शहीद सन्मान योजनेच्या आड भाजपवर या पोस्टर्समधून टीका करण्यात आली होती. चक्क भाजपने आतापर्यंत निर्माण केलेल्या इमेजलाच या पोस्टर्समधून धक्का देण्याचा प्रयत्न झाला होता. भाजप आणि शिवसेना कशी वेगळी आहे, दोहोतील फरक नेमका काय, हे मुद्दे या पोस्टर्समधून अधोरेखित करण्यात आले होते. सकाळी हे पोस्टर्स बघण्यात आल्याने भाजपच्या गोटात चुळबूळ सुरू झाली. पोलीस यंत्रणेलाही त्याची कुणकुण लागताच यंत्रणाही सतर्क झाली आणि बुलडाणा शहरातील हे वादग्रस्त बॅनर्स हटविण्यात आले.  नेमके कोणी ते हटवले, हा मुद्दाही गुलदस्त्यात आहे. संगम चौकातील हे वादग्रस्त बॅनर दोघांनी दुपारी उतरवल्याचे एका प्रत्यक्षदश्रीने सांगितले. भाजप आणि सेना जवळपास ३0 वर्षांपासून हिंदुत्व या मुद्यावर एकत्र निवडणुका लढत आले आहेत; मात्र लोकसभा निवडणुकीनंतर भाजपाने वर्चस्व दाखविण्याचा प्रयत्न केल्याने दिवसेंदिवस या दोन्ही पक्षात दरी वाढत गेली. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आता ती अधिकच रुंदावली आहे.३0 वर्षांच्या युतीधर्मामुळे संपूर्ण जिल्ह्यात भाजपचे जसे कमळ फुलू शकले नाही, तसे शिवसेनेच्या बाबतीतही आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघांमध्ये त्यांच्या कच्च्या दुव्यावर लक्ष केंद्रित करून दोन्ही पक्षांना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शक्ती आजमावी लागणार आहे. त्यामुळे आगामी काळ दोन्ही पक्षांसाठी परीक्षेचा आहे.

परवानगी दिली कोणी?हे वादग्रस्त बॅनर लावण्याची परवानगी कोणी दिली, असा प्रश्नही यानिमित्ताने आता उपस्थित होत आहे. पालिका मुख्याधिकार्‍यांना याबाबत विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता ते आउट ऑफरिच होते. बॅनर्स, पोस्टर पालिकेच्या जागेत लावण्यासाठी शुल्कही आकारले जाते. यापूर्वी तब्बल ७५ पैसे प्रतिस्क्वेअर फूट आकारणी यासाठी पालिका करीत होती. साडेतीन वर्षांआधी त्यात काही बदल झाला होता. आता नव्याने बदल करण्याचे पालिकेचे धोरण होते; पण तेही निश्‍चित झाले की नाही, हे स्पष्ट होऊ शकले नाही; परंतु पालिका तथा पोलीस प्रशासनाची यासाठी काही परवानगी घेतली होती का, हा कळीचा मुद्दा समोर आला आहे.

भाजप जिल्हाध्यक्ष नागपुरातसंपूर्ण राज्यात भाजपविरोधी बॅनर्स लावण्यात आल्याच्या पृष्ठभूमीवर नागपुरात मुख्यमंत्र्यांनी पश्‍चिम विदर्भातील सर्व जिल्हाध्यक्ष आणि नगराध्यक्षांची बैठक बोलावली आहे. बुलडाण्याचे जिल्हाध्यक्षही या बैठकीसाठी सध्या नागपुरात असून, प्रत्यक्ष बैठकीत असल्यामुळे या मुद्यावर ते बोलू शकले नाहीत. ही बैठक मुख्यमंत्र्यांनी नेमकी कशासाठी बोलावली, हे स्पष्ट होऊ शकले नसले, तरी मुख्यमंत्र्यांच्या कानावर बुलडाण्यातील बॅनरबाजीचाही किस्सा पोहोचला, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. दरम्यान, याच मुद्यावर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांच्याशी संपर्क  साधला असता त्यांची फक्त मोबाइलची रिंग वाजत होती. त्यामुळे बॅनरबाजीच्या मुद्यावर दोन्ही बाजूकडून मौन बाळगण्याचा सल्ला वरिष्ठ स्तरावरून दिला की काय, असा प्रश्न निर्माण होत आहे.

पोलिसांचा सावध पवित्राबॅनर्सवरून बुलडाणा शहरात तणाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती; मात्र अनपेक्षितपणे दुसर्‍या दिवशी हे बॅनर्स उतरविल्या गेले. त्यामुळे पोलिसांनी सुटकेचा श्‍वास सोडला असला, तरी ते कोणी उतरवले, त्यासाठी पोलिसांनी मध्यस्थी केली का, असे अनेक प्रश्न सध्या अनुत्तरित आहेत; मात्र वेळीच ही पोस्टर्स उतरविल्या गेले नसते, तर बुलडाण्यात राजकीय तणाव वाढण्याची शक्यता होती. हे पोस्टर्स उतरविण्यात आले असले तरी भाजप-आणि शिवसेनेमध्ये मात्र अंतर्गत स्तरावर याचे पडसाद उमटत राहणार आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाBJPभाजपाShiv Senaशिवसेना