बुलडाणा : भारत विद्यालयाच्या उपकरणाची जिल्हास्तरासाठी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 15:53 IST2018-01-04T15:51:56+5:302018-01-04T15:53:32+5:30

बुलडाणा : पळसखेड भट येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात भारत विद्यालय बुलडाणाचे विद्यार्थी अभिषेक नालिंदे व अभिषेक धंदर  यांच्या उपकरणाची प्राथमिक विभागातून जिल्हास्तरासाठी निवड झाली आहे.

Buldana: Bharat Vidyalaya science model silected | बुलडाणा : भारत विद्यालयाच्या उपकरणाची जिल्हास्तरासाठी निवड

बुलडाणा : भारत विद्यालयाच्या उपकरणाची जिल्हास्तरासाठी निवड

ठळक मुद्देस्वयंचलित पथदिवे हा विषय घेवून त्यांनी उपकरण तयार केले होते. या उपकरणाचा तालुकास्तरावर प्रथम क्रमांक आला आहे. माध्यमिक विभागातून निबंध स्पर्धेत भूषण पायघन याने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.

बुलडाणा : पळसखेड भट येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात भारत विद्यालय बुलडाणाचे विद्यार्थी अभिषेक नालिंदे व अभिषेक धंदर  यांच्या उपकरणाची प्राथमिक विभागातून जिल्हास्तरासाठी निवड झाली आहे. स्वयंचलित पथदिवे हा विषय घेवून त्यांनी उपकरण तयार केले होते. या उपकरणाचा तालुकास्तरावर प्रथम क्रमांक आला आहे. सदर उपकरण जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सादर होणार आहे. यासोबतच प्राथमिक विभागातून निबंध स्पर्धेत विवेक देशमुख याने तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. माध्यमिक विभागातून निबंध स्पर्धेत भूषण पायघन याने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तसेच प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथमेश एंडोले याने द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. ह्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षक विलास देवकर, वैभव चाकणकर व नवल गवई यांनी मार्गदर्शन केले तसेच निबंध स्पर्धेसाठी डॉ.शिवशंकर गोरे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल जिल्हाशिक्षण विभाग, संस्थाध्यक्ष हर्षवर्धन आगाशे, मुख्याध्यापक शालीग्राम उन्हाळे, उपमुख्याध्यपक रामेश्वर पालवे, पर्यवेक्षक मोहन घोंगटे व तालुका विज्ञान संघटना अध्यक्ष प्रशांत खाचणे यांच्या उपस्थित बुधवारी सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)

Web Title: Buldana: Bharat Vidyalaya science model silected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.