शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर ठाणेदाराला अटक

By admin | Updated: May 4, 2017 00:40 IST

मलकापूर- नाहरकत प्रमाणपत्र व जाहिरातीकरिता लाउडस्पिकरच्या परवानगीसाठी ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना मलकापूर पोलीस स्टेशनच्या ठाणेदाराला बुधवारी रंगेहात पकडण्यात आले.

एसीबीची कारवाई : सह आरोपी नवलेही जाळ्यातमलकापूर : आनंद मेला व स्वयं रोजगार प्रदर्शन आयोजित करण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र व जाहिरातीकरिता लाउडस्पिकरच्या परवानगीसाठी ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना मलकापूर पोलीस स्टेशनच्या ठाणेदाराला बुधवारी रंगेहात पकडण्यात आले. दुपारी १२ वाजता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पोलीस स्टेशनच्या आवारातच ही कारवाई केली. मलकापूर येथील गोविंद विष्णू महाजन विद्यालय येथे आनंद मेला व स्वयं रोजगार प्रदर्शन सुरू करण्याकरिता नाहरकत प्रमाणपत्र व जाहिरातीकरिता लाउडस्पिकरची परवानगी मिळण्यासाठी व्यवस्थापक सुरेशराव सावरकर (वय ३३) रा. अकोट जि.अकोला यांनी शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार दीपक रामकृष्ण कोळी यांच्याकडे रीतसर मागणी केली होती. मात्र, त्यांनी या कामाकरिता १ लाख रुपयाच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत योगेश सावरकर यांनी लाचलुचपत कार्यालय बुलडाणा यांच्याकडे तक्रार केली. त्या अनुषंगाने १ मे २०१७ रोजी आयोजित केलेल्या पडताळणी कार्यवाहीमध्ये आरोपी लोकसेवक रतिलाल शंकर नवले पोलीस नाईक यांनी तक्रारकर्ते योगेश सावरकर यांना ठाणेदार दीपक कोळी यांच्यावतीने तक्रारकर्ते यांना ३५ हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. २ मे रोजी पुन्हा आयोजित केलेल्या पडताळणी कार्यवाहीमध्ये आरोपी लोकसेवक दीपक रामकृष्ण कोळी पोलीस निरीक्षक मलकापूर यांनी योगेश सावरकर यांना नवलेंनी सांगितल्याप्रमाणे ३५ हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे पंचासमक्ष स्पष्ट झाले. या गंभीर बाबीची तक्रार झाल्यानंतर बुधवारी सापळा रचून कार्यवाही करण्यात आली. त्यामध्ये ठाणेदार दीपक कोळी यांनी शहर पोलीस स्टेशन ठाणेदारांच्या कार्यालयात ३५ हजार रुपये पंचासमक्ष स्वीकारून स्वत:चा आर्थिक फायदा करून घेतला. त्यावरून ठाणेदार कोळी, पोलीस नाईक नवले यांच्याविरुद्ध कलम ७, १३ (१) (ड) सह १३ (२) भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा सन १९८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश चिमटे, अप्पर पोलीस अधीक्षक विलास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक विलास पाटील, पोनि एस.बी. भाईक, एएसआय शाम भांगे, पोहेकाँ रवींद्र लवंगे, पोना संजय शेळके, सुखदेव ठाकरे, पोकाँ संतोष यादव यांनी पार पाडली. अशी केली कारवाईगत तीन आठवड्यांपूर्वी दीपक कोळी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक म्हणून रूजु झाले होते. नेहमीची ड्युटीवर येण्याची वेळ पाहता त्या मानाने आज ते थोडे लवकरच ड्युटीवर हजर झाले होते. कॅबिनमध्ये बसून घेवाण-देवाण झाली. रक्कम देणारा बाहेर पडला, अन् क्षणार्धात एसीबीचे अधिकारी, कर्मचारी आत धडकले. दरम्यान, पोलीस निरीक्षक कोळी दरवाजापर्यंत येऊन पायऱ्या उतरण्याच्या तयारीत असताना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी हाताचे मनगट पकडून त्यांना आल्या पावली परत त्यांच्याच खुर्चीवर बसून दरवाजा आतून बंद केला आणि या बंद खोलीतच अधिकाऱ्यांनी सत्यता उघड केली.शहर पोलीस स्टेशनही सुटले नाही!शहरातील प्रशासकीय यंत्रणेतील मुख्य अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात गत काळात अडकले. या बाबीला मात्र शहर पोलीस स्टेशन अद्यापपावेतो तरी अपवाद ठरले होते. ती उणीवही शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक कोळी यांना पकडल्यानंतर भरून निघाली. उपविभागीय अधिकारी रामचंद्र मोरे, तहसीलदार लक्ष्मण मेहेंगे, ग्रामीण पोलीस स्टेशनचे बायस्कर, दसरखेड एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक फुसांडे आदी मुख्य अधिकाऱ्यांना यापूर्वी लाचलुचपत विभागाने लाच घेताना रंगेहात पकडले होते. आता शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षकसुद्धा रंगेहात पकडल्या गेले.