सिंदखेड राजातील महाराष्ट्र अर्बनमध्ये धाडसी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 13:32 IST2019-07-12T13:30:35+5:302019-07-12T13:32:33+5:30

पाच लाख १२ हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लंपास केली आहे

The brave bravery in the Maharashtra Urban bank of Sindhkhed raja | सिंदखेड राजातील महाराष्ट्र अर्बनमध्ये धाडसी चोरी

सिंदखेड राजातील महाराष्ट्र अर्बनमध्ये धाडसी चोरी

ठळक मुद्देखासदार प्रतापराव जाधव हे या पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत.पोलिस ठाण्यासमोरत ही पतसंस्था असून मध्ये फक्त रस्ता आडवा आहे.

सिंदखेड राजा : महाराष्ट्र अर्बन कोआॅपरेटीव क्रेडीट सोसायटीच्या सिंदखेड राजा शाखेत दहा जुलै रोजी मध्यरात्री धाडसी चोरी झाली असून या घटनेत पाच लाख १२ हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लंपास केली आहे. बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव हे या पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा तपास लावण्याचे पोलिस प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. विशेष म्हणजे सिंदखेड राजा पोलिस ठाण्यासमोरत ही पतसंस्था असून मध्ये फक्त रस्ता आडवा आहे. त्यामुळे या घटनेचे गांभिर्य वाढले आहे.
ही चोरीची घटना ११ जुलै रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास उघडकीस आली. अज्ञात चोरट्यांनी पतसंस्थेचे शटर वाकवून आत प्रवेश केला व लॉकरमध्ये ठेवलेली पाच लाख १२ हजार ४६४ रुपयांची रोकड लंपास केली. सोबतच पाच हजार रुपये किंमतीचा डिव्हीही चोरून नेला तथा लॉकरचे नुकसान केले आहे. या व्यतिरिक्त चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे व शाखेतील दोन संगणकही फोडले आहेत. त्यामध्ये जवळपास ८० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

Web Title: The brave bravery in the Maharashtra Urban bank of Sindhkhed raja