बोंडअळीसह इतर रोगराईचे आक्रमण; कपाशी पिकावर फिरविले रोटावेटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 16:35 IST2018-08-29T16:34:21+5:302018-08-29T16:35:40+5:30
संग्रामपूर : तालुक्यातील निरोड शिवारात शेतकºयाने कपाशी पिकावर रोटावेटर फिरविले आहे. बोंडअळी तसेच इतर रोगराईने कपाशी पिक हातचे निघून जात असल्याने शेतकºयाने हा निर्णय घेतला. यामुळे शेतकºयांसमोरील संकट अधिकच गडद होताना दिसते.

बोंडअळीसह इतर रोगराईचे आक्रमण; कपाशी पिकावर फिरविले रोटावेटर
लोकमत न्यूज नेटवर्क
संग्रामपूर : तालुक्यातील निरोड शिवारात शेतकºयाने कपाशी पिकावर रोटावेटर फिरविले आहे. बोंडअळी तसेच इतर रोगराईने कपाशी पिक हातचे निघून जात असल्याने शेतकºयाने हा निर्णय घेतला. यामुळे शेतकºयांसमोरील संकट अधिकच गडद होताना दिसते.
अनंता विलासराव अवचार यांचे गट क्र.२७२ मध्ये एक एकर शेत आहे. त्यांनी यावर्षी कपाशीची लागवड केली. मशागतीची कामे सुध्दा वेळच्यावेळी केली. निंदन, रासायनिक खत, महागड्या औषधांची फवारणी सुध्दा केली. मात्र पिकावरील रोगराई जात नसल्याने उभ्या पिकावर रोटावेटर चालविण्याची वेळ आली आहे. कपाशीची लागवड केलेल्या एक एकर शेतात त्यांनी रोटावेटर केले. कपाशी पिकावर कोकडा, लाल्या व बोंडअळीने आक्रमण केल्याने पिकाची वाढ खुंटली आहे. महागडी खते तसेच औषधांची फवारणी केल्याने मोठा आर्थीक फटकाही अवचार यांना सहन करावा लागला. अवचार यांचेकडे भारतीय स्टेट बँक शाखा संग्रामपूरचे ९० हजार रुपये कर्ज आहे. तसेच निशांत बँक शाखा संग्रामपूरचे ७५ हजार रुपये कर्ज आहे. यावर्षी चांगले पीक येईल, या आशेवर शेतकºयाने कर्ज काढून पेरणी केली. मात्र उत्पन्न येण्याआधीच पिकावर रोटावेटर फिरविण्याची वेळ आली. आधीच पाऊस अल्प प्रमाणात पडला, त्यात पिकांवर संक्रांत आल्याने काय करावे, असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे.
नैसर्गीक संकटांमुळे शेतकºयांचे कंबरडे मोडल्या जात आहे. शासनाकडून शेतकºयांना मदतीची घोषणा होते, मात्र वेळेवर मदत मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. कर्ज काढून पेरणी करायची आणि नंतर निसर्गाचे दृष्टचक्रात व रोगराई मुळे पिके उद्ध्वस्त होतात, असा अनुभव शेतकºयांसाठी नित्याचाच झाला आहे. नुकसान झालेल्या शेतकºयांना शासनाकडून आर्थिक मदत देण्याची गरज आहे.
(तालुका प्रतिनिधी)