नेत्रदान संकल्पाला खीळ

By Admin | Updated: June 10, 2015 03:06 IST2015-06-10T03:06:22+5:302015-06-10T03:06:22+5:30

बुलडाणा जिल्ह्यातील नेत्रसंकलन बंद

Bold to eyeball conglomerate | नेत्रदान संकल्पाला खीळ

नेत्रदान संकल्पाला खीळ

नीलेश शहाकार / बुलडाणा : अंध व्यक्तीच्या जीवनात पुन्हा प्रकाश आणण्यासाठी नेत्रदानाशिवाय पर्याय नाही. नेत्रदान हे अनमोल दान असल्याचे सांगितले जात असले तरी जिल्ह्यात नेत्रदान संकल्पाला खीळ बसली आहे. जिल्ह्यात असलेल्या दोन नेत्रपेढीतील नेत्र संकलनाचे काम गत दोन वर्षांपासून बंद आहे. बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातून राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत नेत्रदान मोहीम व जनजागृती कार्यक्रम राबविल्या जातो; मात्र या कार्यक्रमासाठी स्वतंत्र्य कर्मचारी नसल्यामुळे फारसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयावर कार्यक्रमाचा संपूर्ण भार आला आहे. त्यामुळे जिल्हाभरात गेल्या दीड वर्षात ६५0 लोकांनी नेत्रदानाचा संकल्प केला तर मरणोत्तर प्राप्त झालेले ८१ नेत्रबुब्बुळ जालन्याला नेत्रपेढीत पाठविण्यात आले. नेत्रदान करू इच्छिणार्‍यांसाठी बर्‍याच वेळा जिल्ह्यातील आरोग्य केंद्र व इतर रुग्णालयाकडे नेत्रदान संकल्पपत्र नसल्यामुळे अशा नागरिकांना बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले जाते. शिवाय नेत्रदान शस्त्रक्रिया करण्यासाठी बुलडाणा येथील वैद्यकीय पथकालाच पाचारण करण्यात येते. शिवाय नेत्रसंकलनाची सुविधा नसल्यामुळे मोजक्या खासगी रुग्णालयात नेत्रदानासाठी शस्त्रक्रिया केली जाते. त्यामुळे जिल्ह्यात नेत्रदान संकल्पाला खीळ बसली आहे.

Web Title: Bold to eyeball conglomerate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.