बोगस बियाण्यावरून शेतकऱ्यांमध्ये वाढला संभ्रम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 03:33 PM2019-06-23T15:33:48+5:302019-06-23T15:34:13+5:30

खरीप हंगामाची पेरणी तोंडावर आलेली असताना कृषी विभागाने सिंदखेड राजा तालुक्यातील एका शेतकºयावर बोगस बियाणे प्रकरणी कारवाई केली.

Bogus seeds increase farmer confusion! | बोगस बियाण्यावरून शेतकऱ्यांमध्ये वाढला संभ्रम!

बोगस बियाण्यावरून शेतकऱ्यांमध्ये वाढला संभ्रम!

googlenewsNext

बुलडाणा: सिंदखेड राजा तालुक्यातील उमरद येथे कृषी विभागाने बोगस बियाण्यावरून एका शेतकºयावर कारवाई केल्याने बोगस बियाणे नेमके ओळखायचे तरी कसे, असा प्रश्न शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे. बोगस बियाण्यावरून शेतकºयांमध्येही संभ्रम वाढला असून, पेरणी तोंडावर आलेली असताना कृषी विभागाकडून कृषी केंद्राची तपासणी सोडून थेट शेतकºयांवर कारवाई होत असल्याने शेतकºयांमधून रोष व्यक्त होत आहे.
खरीप हंगामाची पेरणी तोंडावर आलेली असताना कृषी विभागाने सिंदखेड राजा तालुक्यातील एका शेतकºयावर बोगस बियाणे प्रकरणी कारवाई केली. या कारवाईने कृषी क्षेत्राच्या वर्तुळात गोंधळ उडाला आहे. प्रशासनाच्या या कारभारावर शेतकरी संघटनाही आक्रमक झाल्या आहेत. भारतात काही बियाण्यांच्या लागवडीवर शासनाने प्रतिबंध घातले आहेत. तसेच तणनाशक प्रतिरोध करणाºया कपाशीच्या एचटीबीटी बियाण्याला जगभर मान्यता देण्यात आलेली असताना भारतात मात्र अजूनही पर्यावरण कायद्यांतर्गत त्याला मान्यता देण्यात येत नाही. शासनाच्या या धोरणांचा निषेध नोंदवून अशा प्रकारचे कोणतेही तंत्रज्ञानाचे व शेतकºयांच्या उत्पादनात भर घालणाºया बियाण्यावरील बंदी उठविण्यात यावी, अशी मागणी शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेने लावून धरली आहे. सध्या शेतकºयांची खत, बियाणे खरेदीची लगबग सुरू आहे. अशातच सिंदखेड राजा तालुक्यातील उमरद येथे घडलेल्या कपाशीच्या एचटीबीटी प्रकरणाने शेतकºयांमध्ये बोगस बियाणे नेमके ओळखायचे तरी कसे, याची धास्ती निर्माण झाली आहे. कुठलेही सोयाबीन, कपाशी यापैकी कुठलेही बियाणे खरेदी करताना शेतकरी विचार करीत आहेत.
बुलडाण्यात होणार सविनय कायदेभंग!
कापसाच्या एचटीबीटी बियाण्यावर बंदी करणाºया धोरणाचा निषेध करण्यासाठी शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एचटीबीटी कापसाच्या बियाण्याची लागवड करून हे आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात शेतकरी नामदेवराव जाधव, एकनाथ थुट्टे, सुरेश सोनुने यांच्यासह शेतकरी सहभागी होणार आहेत.
शेतकरी अडचणीत
बोगस बियाण्यावरून झालेल्या या कारवाईनंतर शेतकरी अडचणीत सापडले आहेत. बियाणे खरेदी करताना कोणती काळजी घ्यायची, प्रतिबंधित बियाणे कसे ओळखायचे, याची कुठलीच जागृती कृषी विभागाकडून करण्यात आली नाही. कोणत्या बियाण्यावर बंदी आहे, यापासून शेतकरीच अनभिज्ञ आहेत. त्यामुळे शेतकºयांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.


प्रगत देशात कमीत-कमी खर्चात अधिक उत्पादन वाढविण्यात येत आहे; मात्र भारतात जनुकीय बदल केलेल्या बियाण्याच्या लागवडीस प्रतिबंध करण्यात येत आहे. शेतकºयांच्या आर्थिक उन्नतीसाठी शेतकºयांना बाजारपेठेचे व तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य मिळणे आवश्यक आहे; मात्र येथे शेतकºयांचे उत्पन्न वाढविण्याचा विचार न होता उलट त्यांच्यावर कारवाई केली जात आहे.
- नामदेवराव जाधव, राज्य कार्यकारिणी सदस्य, शेतकरी संघटना.

 

Web Title: Bogus seeds increase farmer confusion!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.