शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

बीजभांडवल योजनेत बोगस लाभार्थी

By admin | Updated: July 31, 2015 23:40 IST

नियमबाह्य वाटप; लाभार्थ्याच्या नावावर काढले १.१६ कोटी.

सिद्धार्थ आराख / बुलडाणा : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक व त्यांच्या अधिनस्थ कर्मचार्‍यांनी अर्थसाहाय्याच्या विविध योजना राबविताना शासनाचे सर्व नियम धाब्यावर ठेवून मनमानी पद्धतीने अक्षरश: खिरापत वाटल्यासारखा योजनांचा पैसा वाटप केला. त्यासाठी जिल्हाभरात दलालांची मोठी फौज उभी करण्यात आली होती. या दलालांमार्फत पैसा वाटप केल्यामुळे मातंग समाजातील गरजू व होतकरू लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ मिळाला नाही. परिणामी शासनाच्या कोट्यावधी रुपयाच्या निधीचा अपहार करून अण्णाभाऊ साठे अर्थिक विकास महामंडळातील अधिकारी- कर्मचारी व दलालांनीच या पैशावर डल्ला मारल्याचे चौकशीमध्ये सिध्द झाले आहे. बीजभांडवल योजनेंतर्गत मातंग समाजातील गरजू व्यक्तींना व्यवसाय उभा करण्यासाठी ५0 हजार ते १ लाखापर्यंत कर्जपुरवठा केला जातो. मात्र बुलडाणा कार्यालयाने नियमाची ऐशीतैशी करत एका - एका लाभार्थ्याच्या नावावर ४0-४0 लाख रूपये काढले. विशेष म्हणजे लाभार्थ्यांना रेखांकीत चेकद्वारे अथवा त्यांच्या खात्यात कर्जाची रक्कम जमा करून द्यावी लागते. मात्र सन २0१३-१४ आणि २0१४-१५ या वार्षात कर्ज वाटप करताना कोट्यावधी रूपयाच्या रकमा बेअरर चेकद्वारे तसेच रोखीने वाटप करण्यात आले. या गंभीर बाबीची नोंद चौकशी समितीने घेतली आहे. सन २0१३-१४ मध्ये बिज भांडवल योजने अंतर्गत संपूर्ण जिल्ह्यातून केवळ चारच लाभार्थ्यांना १ कोटी १६ लाख रुपयाचे मनमाणी प्रकारे कर्ज दिल्याचे दाखविण्यात आले. दलालांच्या माध्यमातून बनावट कागदपत्रे व बोगस लाभार्थी दाखवून बिज भांडवल योजनेचे १ कोटी १६ लाख रूपये दलाल व अधिकारी-कर्मचार्‍यांनी हडप केल्याचे चौकशी समितीने आपल्या अहवालात नमुद केले आहे. या योजनेमध्ये लाभार्थी दाखविलेल्या लोकांच्या घरी जावून चौकशी केली असता लाभार्थ्यांनी कर्ज प्रकरणासाठी कोठेही अर्ज केले नव्हते अशी धक्कादायक माहिती चौकशी अधिकार्‍यासमोर दिल्याने जिल्हा व्यवस्थापक पी.टी.पवार, लेखाअकिारी व्ही.एस. जाधव आणि यांना सहकार्य करणारा कंत्राटी कर्मचारी राजू मोरे आणि चार दलाल यांनी बोगस लाभार्थी दाखवून बँकांमधून त्यांच्या नवावार लाखो रूपच्या रकमा काढून अपहार केल्याचे निष्पन्न होत असल्याचा ठपका चौकशी समितीने ठेवला आहे.