पुरात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 11:51 IST2020-09-23T11:51:32+5:302020-09-23T11:51:45+5:30

युवकाचा मृतदेह बुधवारी सकाळी शिवारातील ज्ञानगंगा नदीपात्रात सापडला.

The body of a young man who was swept away in the flood was found | पुरात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला

पुरात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदुरा : तालुक्यातील ज्ञानगंगा नदीत वाहुन गेलेल्या युवकाचा मृतदेह बुधवारी सकाळी शिवारातील ज्ञानगंगा नदीपात्रात सापडला.
तालुक्यातील रामपूर येथील नितीन रवींद्र चावरे वय (२३) हा सोमवार, २१ सप्टेबरच्या दुपारी तीन वाजता दरम्यान ज्ञानगंगा नदी पात्रातून त्याच्या शेतात जात असताना नदीपात्रात अचानक पाणी वाढल्याने वाहून गेला होता. मागील दोन दिवसांपासून प्रशासन व गावकरी त्याचा कसून शोध घेत होते. अखेर २३ सप्टेबरच्या सकाळी अवधा शिवारातील नदीपात्रातुन जाणाऱ्या शेतकरी व मजूर यांना अनोळखी व्यक्तीचा मृतदेह दिसून आल्याची माहिती प्रशासनाला देण्यात आली. हा मृतदेह दोन दिवसांपूर्वी पुरात वाहून गेलेल्या रामपूर येथील नितीन रवींद्र चावरे याचे असल्याचे निष्पन्न झाले.

Web Title: The body of a young man who was swept away in the flood was found