३६ वर्षीय बेपत्ता तरुणाचा मृतदेह विहिरीत आढळला
By विवेक चांदुरकर | Updated: September 13, 2023 18:51 IST2023-09-13T18:50:47+5:302023-09-13T18:51:00+5:30
नांदुरा तालुक्यातील नायगाव येथील गणेश मनोहर दांडगे (वय ३६) हा तरुण तीन दिवसांपूर्वी बेपत्ता झाला होता.

३६ वर्षीय बेपत्ता तरुणाचा मृतदेह विहिरीत आढळला
नांदुरा (बुलढाणा) : तालुक्यातील नायगाव येथील गणेश मनोहर दांडगे (वय ३६) हा तरुण तीन दिवसांपूर्वी बेपत्ता झाला होता. घटनेची फिर्याद नांदुरा पोलिस स्टेशनला देण्यात आली होती. तरुणाचा मृतदेह नायगाव येथील सुपडा डांबरे यांच्या शेतातील विहिरीत मृताचा भाऊ मंगेश दांडगे याला आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच आमदार राजेश एकडे यांनी मदत कार्यासाठी ओम साई फाउंडेशन व घटनास्थळावर शवविच्छेदन करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी यांना पाठवले.
यावेळी ओम साई फाउंडेशन नांदुराचे अध्यक्ष विलास निंबोळकर, पीयूष मीहानि, कृष्णा नालट, सचिन पुंडे, अजय गवई, राजू बगाडे यांच्या जीवन रक्षक टीमने मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. प्राथमिक आरोग्य केंद्र शेंबाच्या वैद्यकीय अधिकारी कल्याणी राजपूत यांनी घटनास्थळावरच शवविच्छेदन केले. पोलिस हेडकॉन्स्टेबल संजय निंबोळकर, विक्रम राजपूत, उमेश भारसाकळे, पोलिस पाटील बाजीराव इंगळे, किशोर चोपडे व बहुसंख्य गावकरी उपस्थित होते.