शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
2
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
3
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
4
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
5
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
7
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
8
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
9
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
10
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
11
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
12
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
13
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
14
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
15
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
16
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
17
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
18
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
19
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
20
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश

बेपत्ता झालेल्या इसमाचा खून

By admin | Updated: July 13, 2014 23:37 IST

अनैतिक संबंधातून भावाने केली हत्या

बुलडाणा : अनैतिक संबंधात अडचण ठरत असलेल्या लहान भावाला मोठय़ा भावानेच १९ मार्च २0१४ रोजी डोंगरखंडळा शिवारातील शेतातील विहिरीत ढकलले, असा खुलासा आज मृतकाच्यय पत्नीने केला. यापूर्वी मृतकाच्या पत्नीने पती ८ दिवस उलटूनही परतले नसल्याची तक्रार बुलडाणा ग्रामीण पोलिस स्टेशनला २७ मार्च रोजी केली होती. याप्रकरणी पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर सदर बेपत्ता इसमाचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे.याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुलडाणा तालुक्यातील डोंगरखंडाळा येथील विक्रम हरिभाऊ सावळे (७0) हे आपल्या दोन मुलांसोबत राहतात. त्यांचा मोठा मुलगा राम सावळे (३८) आणि मृतक लहान मुलगा लक्ष्मण (३५) होता. काही वर्षांपासून मोठा भाऊ राम याचे लहान भाऊ लक्ष्मण याच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते; मात्र काहीच दिवसात या अनैतिक संबंधाबाबत कुटुंबातील लोकांना माहिती झाली. याच कारणातून लक्ष्मण आणि त्याच्या पत्नीत खटके उडू लागले. लहान भाऊ लक्ष्मण या अनैतिक संबंधात अडचणी निर्माण करीत असल्यामुळे मृतकाची पत्नी व मोठा भाऊ राम या दोघांनी मिळून १९ मार्च रोजी लक्ष्मणला शेतातील विहिरीत ढकलून त्याची हत्या केली. शिवाय लक्ष्मण शेगावला दर्शनासाठी गेला असल्याची अफवा गावभर पसरून दिली. याबाबत आठ दिवसानंतर २७ मार्च रोजी वडील विक्रम सावळे यांनी बुलडाणा ग्रामीण पोलिसात लक्ष्मण हरवल्याची तक्रार दिली. या प्रकरणी तपास सुरू असताना लक्ष्मणची हत्या केल्याची कबुली मृतकाच्या पत्नीने पोलिसांपुढे दिली. या प्रकरणी वडील विक्रम सावळे यांच्या तक्रारीवरून भाऊ राम सावळे आणि पत्नी यांच्यावर भादंवि ३0२, २0१ आणि ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला. यात मृतकाच्या पत्नीस १७ जुलैपर्यंत पोलिस कोठडी मिळाली असून, राम सावळे अद्यापही फरार आहे.