रक्तदानाने घडवला इतिहास

By Admin | Updated: August 6, 2014 00:38 IST2014-08-05T22:22:34+5:302014-08-06T00:38:00+5:30

सामाजिक उपक्रम : स्व.मुंडेच्या स्मरणार्थ रक्तदान

Blood Donation History | रक्तदानाने घडवला इतिहास

रक्तदानाने घडवला इतिहास

दे.राजा: ह्यकशाची दिली ही सजा काय केला होता गुन्हा, बुध्दीबळाच्या पटावरुन आज राजाच झालाय वजा.ह्ण भाजपाचे जेष्ठ नेते केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या दुर्दैवी निधनानंतर साकारलेल्या ह्या ओळी तमाम चाहत्यांच्या भावना हेलावून टाकणार्‍या ठरल्या. आणि याच भावनेच्या पोटी त्यांच्या स्मरणार्थ महारक्तदान शिबिर आयोजित करण्याचा विचार पुढे आला. देऊळगांवराजात ३ जुलै २0१४ रोजी सर्व जाती धर्माच्या २३१७ चाहत्यांनी रक्तदान करुन गोपीनाथ मुंडेच्या स्मरणार्थ इतिहास घडवला.
देऊळगांवराजा तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण बुलडाणा जिल्हयात एकाच केंद्रावरुन एवढया मोठया संख्येने रक्तदान होण्याचा हा पहिला प्रसंग ठरला. गोपीनाथ मुंडे यांच्या तरुण चाहत्यांनी एकत्र येऊन लोकनेता प्रतिष्ठाणची स्थापना केली हेतू आणि भावना प्रांजळ असल्याचे प्रतिष्ठाणच्या सदस्यांनी दे.राजा, जालना, सिंदखेडराजा आणि लोणार येथील डॉक्टर असोसिएशनच्या सदस्यांपुढे ही संकल्पना मांडली. त्यांनीही यात लगेच होकार दर्शवला. आणि महारक्तदान शिबिराच्या आयोजनाची तयारी सुरु झाली. जालना, औरंगाबाद, अहमदनगर आणि बुलडाणा येथील एकूण बारा रक्तपेढी केंद्राशी संपर्क साधण्यात आला. त्यांची संमती मिळाली आयोजनाचा खर्च लाखो रुपयांच्या घरात असतांनाही कुणालाही एक रुपयाही न मागता लोकनेता प्रतिष्ठाणचे सदस्य आणि डॉक्टर असोसिएशनच्या सदस्यांनी या खर्चाची जबाबदारी स्वत: उचलली जालना, देऊळगांवराजा, सिंदखेडराजा आणि लोणार या तालुक्यातील शहर आणि गावागावात महारक्तदान शिबिराची माहिती पोहचवण्यात आली. ३ जुलैला दे.राजातील म्यु. शिवाजी हायस्कुलच्या प्रांगणात सकाळी आठ वाजेपासूनच महारक्तदान शिबिराला प्रारंभ झाला. आयोजकांनी कौतुकास्पद नियोजन केले होते. ङ्म्रध्दांजली कक्षात मुंडे साहेबांना अभिवादन करुन सर्व जातीधर्माचा त्यांचा चाहता रक्तदान करत होता. नोंदणीचे बारा स्टॉल, रक्तदान प्रक्रियेचे बारा कक्ष गर्दीने फुलुन गेले होते. महिलांनी रक्तदानासाठी केलेली गर्दी लक्षणीय ठरली. ग्रामीण भागातून महिला पुरुष व तरुणवर्गही रक्तदानासाठी शिबिराकडे धावला. रक्तदानासारखे पवित्र दान नाही हे ओळखून आयोजकांनी शिबिराचे आयोजन करुन हजारो रुग्णांना जीवदान देण्याचे पवित्र काम केले.

Web Title: Blood Donation History

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.