आज रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:30 IST2021-01-13T05:30:19+5:302021-01-13T05:30:19+5:30

येथील विविध मंडळांंच्या वतीने सावित्री-जिजाऊ दशरात्रोत्सव व राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून या शिबिराचे आयोजन करण्यात आहे. यावेळी ...

Blood donation camp today | आज रक्तदान शिबिर

आज रक्तदान शिबिर

येथील विविध मंडळांंच्या वतीने सावित्री-जिजाऊ दशरात्रोत्सव व राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून या शिबिराचे आयोजन करण्यात आहे. यावेळी रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना रक्त गटासह प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्थानिक महात्मा बसवेश्वरनगर तलाठी कार्यालय येथे सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत हे शिबिर राहणार आहे. रक्तादन शिबिराला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक जय संतोषी माता क्रीडा मंडळ, महर्षी वाल्मीकी मंडळ, क्रांतिसूर्य महात्मा फुले ग्रुप, जय बजरंग क्रीडा मंडळ, राजमाता जिजाऊ मंडळ, महाबली आखाडा, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मित्रमंडळ, टायगर ग्रुप, जीवन अल्पसंख्याक बहुउद्देशीय संस्था, महात्मा बसवेश्वर बहु. युवा प्रतिष्ठान, भीमबल क्रीडा मंडळ, जय गजानन मित्रमंडळ, संताजी महाराज नवयुवक मित्रमंडळ, श्रीसंत सेना नाभिक मंडळ, रेणुकामाता गोंधळी समाज बहु. संस्था, क्षत्रिय भावसार समाज आदींच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: Blood donation camp today