तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या रक्तदान शिबिर ४१ जणांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:40 IST2021-08-20T04:40:28+5:302021-08-20T04:40:28+5:30
वर्ल्ड फोटोग्राफी दिनानिमित्त चिखली तालुका फोटोग्राफर असोसिएशनव्दारे चिखलीत रक्तदान शिबीर घेण्यात आले. या शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून गुप्त बोलत होते. ...

तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या रक्तदान शिबिर ४१ जणांचे रक्तदान
वर्ल्ड फोटोग्राफी दिनानिमित्त चिखली तालुका फोटोग्राफर असोसिएशनव्दारे चिखलीत रक्तदान शिबीर घेण्यात आले. या शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून गुप्त बोलत होते. प्रमुख उपस्थितीत नगराध्यक्षा प्रिया कुणाल बोंद्रे, पत्रकार सुधीर चेके पाटील, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष उद्धव थुट्टे पाटील तर सत्कारमूर्ती म्हणून सेवा संकल्प प्रतिष्ठानचे नंदकुमार पालवे व आरती पालवे, मुंगसाजी महाराज पतसंस्थेचे अध्यक्ष दीपक देशमाने, हौशी वाइल्ड लाईफ फोटोग्राफर पुरस्कारप्राप्त अमितकुमार चोपडा, ग्राफिक डिझायनर नारायण भोलवकर, हौशी नेचर फोटोग्राफर कौस्तुभ मानतकर यांची उपस्थिती होती. प्रारंभी शहीद जवान कैलास भारत पवार व बीबी येथील जवान किशोर काळुसे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या शिबीरात तालुक्यातील ४१ छायाचित्रकारांनी स्वयंत्स्फूर्तीने रक्तदान केले. चिखली अर्बन बँकचे अध्यक्ष सतीश गुप्त आणि फोटोग्राफर असोसिएशन यांच्या पुढाकाराने सर्व फोटोग्राफर बांधवांचे खाते उघडून विमा काढण्यात आला. राजेश पिराजी सौभागे यांचे अपघाती निधन झाल्यामुळे त्यांच्या वारसदाराला दोन लाख रुपयांचा विमा धनादेश चिखली अर्बनचे अध्यक्ष गुप्त यांच्या हस्ते सोपविण्यात आला. प्रसंगी सत्कारमूर्तींचा फोटोग्राफर असोसिएशनव्दारे यथोचित सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन रवी वानखेडे, प्रास्ताविक चिखली फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष अमोल बेलोकार तर आभार जयेश बेलोकार यांनी मानले. यशस्वीतेसाठी चिखली तालुका फोटोग्राफर असोसिएशनचे उपाध्यक्ष यासीन शहा, कमलेश पारीख, सहसचिव विशाल होगे, कोषाध्यक्ष बाजीराव देशमुख, संघटक सुदर्शन इंगळे, राहुल महाजन, किरण महाडी, सोहेल शेख, दिपक खांदवे, राहुल महाळनकर, विजय खरे, मनोज देशमाने, सतीश शिंदे, राजू वगदे आदींनी परिश्रम घेतले.