देऊळगावमही येथे रक्तदान शिबिर उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:22 IST2021-07-12T04:22:26+5:302021-07-12T04:22:26+5:30
यावेळी युवा राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्ष समाधान शिंगणे व जिल्हा परिषद बांधकाम सभापती रियाज खान पठाण व ...

देऊळगावमही येथे रक्तदान शिबिर उत्साहात
यावेळी युवा राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्ष समाधान शिंगणे व जिल्हा परिषद बांधकाम सभापती रियाज खान पठाण व जैन समाज अध्यक्ष राजूभाऊ डुंगरवाल, सरपंच रामकिशन म्हस्के, रवींद्र जैन आदी उपस्थित हाेते. शिवछत्रपती ग्रुप अध्यक्ष सतीश शिंगणे, जैन समाज अध्यक्ष राजूभाऊ डुंगरवाल याच्या संयोगाने लोकमत रक्ताचं नातं महायज्ञ शिबिर घेण्यात आले. यावेळी रक्तदान करणाऱ्या शीलाबाई रवींद्र कोटेचा यांचा महिला पत्रकार पूजाताई कायंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. छत्रपती ग्रामीण बिगर पतसंस्थेचे अध्यक्ष समाधान शिंगणे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य सुनील मोरे व ग्रामपंचायत कर्मचारी शिंगणे यांनी रक्तदान केले. सूत्रसंचालन अभिजित शिंगणे यांनी केले. जालना येथील समर्थ रक्तपेढी यांनी सेवा दिली. शिबिरासाठी प्रकाश साकला, बाबासाहेब साळवे, गजानन चोपडे, अंबादास बुरकुल, पंढरीनाथ गिते, देऊळगावराजातून पूजाताई कायंदे, मानवाधिकार संघटन जिल्हा सचिव जाकीर शेख यांनी परिश्रम घेतले.
110721\20210710_123735.heic
लोकमत रक्तदान चे प्रमाणपत्र देताना