रस्त्याच्या दुरूस्तीसाठी ग्रामस्थांचा रास्ता रोको; सैलानी-बुलढाणा मार्गावर आंदोलन

By ब्रह्मानंद जाधव | Updated: October 6, 2023 16:57 IST2023-10-06T16:57:34+5:302023-10-06T16:57:57+5:30

रस्ता दुरुस्ती करण्याच्या मागणीसाठी तालुक्यातील साखळी खुर्द येथील ग्रामस्थांनी ६ ऑक्टोबर रोजी रास्ता रोको केला.

Block the path of villagers for road repair; Protest on Saylani-Buldhana route | रस्त्याच्या दुरूस्तीसाठी ग्रामस्थांचा रास्ता रोको; सैलानी-बुलढाणा मार्गावर आंदोलन

रस्त्याच्या दुरूस्तीसाठी ग्रामस्थांचा रास्ता रोको; सैलानी-बुलढाणा मार्गावर आंदोलन

बुलढाणा : सैलानी- बुलढाणा मार्गावरील साखळी खुर्द येथील मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्ता दुरुस्ती करण्याच्या मागणीसाठी तालुक्यातील साखळी खुर्द येथील ग्रामस्थांनी ६ ऑक्टोबर रोजी रास्ता रोको केला.

सैलानी- बुलढाणा मार्गावरील साखळी खुर्द येथील मुख्य रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. भरधाव टिप्पर वाहतूक सुद्धा त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. याकरिता शिवसेना शिवदूत तालुका समन्वयक नितीन राजपूत यांच्या पुढाकारातून साखळी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. 

रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. यावेळी समाधान बापू देशमुख, चेतन देशमुख, हिवाळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. या रस्त्याच्या दुरूस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

Web Title: Block the path of villagers for road repair; Protest on Saylani-Buldhana route