लॉकडाऊन रद्दसाठी वंचित बहुजन आघाडीचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 10:57 IST2021-04-07T10:57:44+5:302021-04-07T10:57:51+5:30

Vanchit Bahujan Aaghadi : वंचित बहुजन आघाडीच्यावतीने ६ एप्रिल रोजी बुलडाण्यात रास्ता रोको करण्यात आला.

Block the path of Vanchit Bahujan Aaghadi for cancellation of lockdown | लॉकडाऊन रद्दसाठी वंचित बहुजन आघाडीचा रास्ता रोको

लॉकडाऊन रद्दसाठी वंचित बहुजन आघाडीचा रास्ता रोको

बुलडाणा : लॉकडाऊनच्या संदर्भात जिल्हाधिकारी यांनी ५ एप्रिल रोजी काढलेला आदेश रद्द करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने ६ एप्रिल रोजी बुलडाण्यात रास्ता रोको करण्यात आला. लॉकडाऊन निर्णयाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
लॉकडाऊनचा आदेश देताना शासनाने गोरगरीब जनतेचा विचार केला नसल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने यावेळी केला. मागील वर्षी केलेल्या लाॅकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेला लॉकडाऊनचा हा नविन आदेश तातडीने रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष नीलेश जाधव यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको  आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा संघटक बालाभाऊ राऊत, तालुकाध्यक्ष श्रीकांत जाधव, बाळासाहेब वानखेडे, रमेशसिंग राजपूत, अर्जुन खरात, गाडेकर, विजय राऊत, दिलीप राजभोज, शंकर मलवार, मिलींद वानखेडे, सुरेंद्र जाधव आदी उपस्थित होते.

Web Title: Block the path of Vanchit Bahujan Aaghadi for cancellation of lockdown