काळी पिवळीने ऑटोला उडविले

By Admin | Updated: August 25, 2014 02:24 IST2014-08-25T01:59:54+5:302014-08-25T02:24:36+5:30

शेगाव-खामगाव रस्त्यावर अपघात

Black and white were blown away | काळी पिवळीने ऑटोला उडविले

काळी पिवळीने ऑटोला उडविले

शेगाव : शेगाव येथून खामगावकडे भरधाव जाणार्‍या काळी-पिवळी टॅक्सीने समोरून येणार्‍या ऑटोला जबर धडक दिली. या झालेल्या अपघातात एकाच परिवारातील चार जण गंभीर, तर दोन जण किरकोळ जखमी झाले. ही घटना आज रविवारी सायंकाळी ५.३0 च्या सुमारास घडली.
एमएच २८-एच-८२४ क्रमांकाची काळी- पिवळी मार्शल जीप शेगाववरून खामगावकडे भरधाव जात असताना कनारखेड फाट्याजवळील पुलावर समोरून येणार्‍या एमएच २८-टी-१७४१ क्रमांकाच्या ऑटोला काळी पिवळीने जबर धडक दिली. या धडकेत ऑटोचा चुराडा झाला. तसेच ऑटोचालक गजानन किसन गव्हाळ, रा. सतीफैल खामगाव याच्यासह त्याच्याच परिवारातील ४ जण गंभीर, तर २ जण किरकोळ जखमी झाले. या अपघातात गजानन गव्हाळ याच्या डोक्याला गंभीर इजा झाली. पत्नी सुनंदा गजानन गव्हाळ (वय ३0 वर्ष), खुशी (वय ८ वर्ष), सलोनी (वय ४ वर्ष) हे गंभीर जखमी झाले. नागरिकांनी त्यांना शेगावच्या सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणल्यानंतर डॉ. पंडित व त्यांच्या चमूने तातडीने उपचार केले.
गंभीर इजा झाल्याने यातील सुनंदा गव्हाळ व सलोनी हिला अकोला येथे उपचारार्थ हलविले आहे. याच ऑटोमध्ये बसलेल्या लक्ष्मीबाई रामकृष्ण गिते रा. गितेचा मळा, शेगाव यासुद्धा जखमी झाल्या. ऑटोचालक गव्हाळ यांची दोन वर्षीय प्रगती हिला सुदैवाने कुठलीही इजा झालेली नाही. टॅक्सी चालकाने धडक दिल्यानंतर पुढे जाऊन टॅक्सीसुद्धा उलटली. अपघात घडताच यातील प्रवाशांसह चालक फरार होण्यात यशस्वी झाला.

Web Title: Black and white were blown away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.