सिंदखेड राजा येथे भाजपची मोटारसायकल रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:36 IST2021-08-23T04:36:58+5:302021-08-23T04:36:58+5:30

२३ ऑगस्ट रोजी युवा वारियर्स शाखेचा उद्घाटन सोहळा सकाळी ९ वाजता स्थानिक टी पॉईंट येथे पार पडणार आहे.जिजाऊ सृष्टी ...

BJP's motorcycle rally at Sindkhed Raja | सिंदखेड राजा येथे भाजपची मोटारसायकल रॅली

सिंदखेड राजा येथे भाजपची मोटारसायकल रॅली

२३ ऑगस्ट रोजी युवा वारियर्स शाखेचा उद्घाटन सोहळा सकाळी ९ वाजता स्थानिक टी पॉईंट येथे पार पडणार आहे.जिजाऊ सृष्टी येथुन मोटार सायकल रॅलीला सुरुवात करण्यात येणार आहे. राजमाता जिजाऊ चे दर्शन घेतल्यानंतर स्थानिक नगर परिषद टॉवन हॉल मध्ये सभेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदेश महामंत्री भाजपा चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा मोर्चा युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील हे पत्रकार परिषद घेवून पत्रकारांशी संवाद साधणार आहे. या सभेसाठी भाजपा कार्यकर्ते विविध आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपाचे प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ यांनी केले आहे. युवा वारियर्स मेळाव्यासाठी प्रदेश महामंत्री भाजपा चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा मोर्चा युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील,प्रदेश उपाध्यक्ष आमदार संजय कुटे ,भाजपा जिल्हा अध्यक्ष आमदार आकाश फुंडकर , प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर, प्रदेश सचिव अनुप मोरे ,भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख यांच्यासह भाजपाचे गण मान्यवर तसेच जिल्हातील व मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्यांची माहिती भाजपा प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली़

युवकांना जाेडणार

युवकांच्या माध्यमातून विविध योजना जनतेपर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत़ त्याचप्रमाणे युवकांना जोडण्यासाठी युवा वारियर्स काम करणार असल्याचे प्रदेश प्रवक्ता विनोद वाघ यांनी सांगितले. जिल्हामध्ये विविध ठिकाणी युवा वारियर्स शाखेचे उद्घाटन होणार आहे.

Web Title: BJP's motorcycle rally at Sindkhed Raja