शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
5
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
6
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
7
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
8
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
9
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
10
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
11
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
12
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
13
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
14
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
15
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
16
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
17
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
18
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
19
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
20
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी

कोरेगाव भीमा येथील दंगलीत भाजपचा हात - रविकांत तुपकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2018 12:53 AM

कोरेगाव भीमा येथे घडलेली दंगल ही पूर्वनियोजित व भाजपने घडवून आणलेली असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे नेते तथा वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केला; तसेच झालेल्या घटनेचा निषेध करून त्यांनी शांतता राखण्याचे आवाहनदेखील केले. 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक घटनेला २00 वर्षे पूर्ण झाल्याच्या पृष्ठभूमीवर हा विजयी उत्सव साजरा करण्यासाठी कोरेगाव भीमाला लाखोच्या संख्येने समाजबांधव येणार होते. याची कल्पना सरकारला असायला हवी होती, नसेल तर सरकारची गुप्तचर यंत्रणा काय करते? पोलीस यंत्रणेला जर माहीत असेल तर सरकारने बघ्याची भूमिका का घेतली? असा प्रश्न उपस्थित करून कोरेगाव भीमा येथे घडलेली दंगल ही पूर्वनियोजित व भाजपने घडवून आणलेली असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे नेते तथा वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केला; तसेच झालेल्या घटनेचा निषेध करून त्यांनी शांतता राखण्याचे आवाहनदेखील केले. याबाबत तुपकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, भाजप सरकारने निवडणुकीत जनतेला अनेक आश्‍वासने दिली होती; मात्र सत्तेवर येऊन या सरकारला चार वर्षे होत आली, तरीही आश्‍वासनांची पूर्तता झालेली नाही. सामान्य जनता सरकार विरोधात उघडपणे बोलत आहे, त्यामुळे मुख्य प्रश्नांपासून जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठी गावागावांत जातीयवाद निर्माण करून भांडणे लावणे, ही भाजप सरकारची जुनीच खेळी आहे. वास्तविक गावागावांत दलित व मराठा समाजाचे नागरिक गुण्या-गोविंदाने नांदतात. या दोन समाजात भांडणे लावून राजकीय पोळी भाजण्याचा सरकारचा डाव आहे. २0१९ च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मतांचे धृव्रिकरण करून राजकीय फायदा मिळवायचा, हा डाव भाजपचा आहे, हे आता जनतेने वेळीच ओळखले पाहिजे.  कोरेगाव भीमाचा खरा इतिहास खोडून काढून, बहुजनांच्या मुलांच्या हाती तलवारी देऊन, त्यांची माथी भडकावून भांडणे लावायची आणि याची सूत्रे मात्र आपल्या हातात ठेवायची, ही भाजप व त्यांच्या पिलावळांची नीती ओळखून मराठा व दलित समाजातील तरुणांनी जागरुक झाले पाहिजे. देशांतर्गत जातीय दंगली घडवणे हे भाजप सरकारचे विखारी षड्यंत्र आहे. भविष्यात आपआपसात भांडणे करून आपलेच रक्त सांडण्याऐवजी बहुजन समाजातील तरुणांनी एकत्र येऊन नव्याने निर्माण झालेल्या प्रस्थापित पेशवाई विरुद्ध संघर्ष उभा करावा, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे नेते रविकांत तुपकर यांनी केले. शेवटी जनतेने झालेल्या घटनेचा शांततेच्या मार्गाने निषेध करावा, असे आवाहनही त्यांनी केले.       

टॅग्स :buldhanaबुलडाणाBhima-koregaonभीमा-कोरेगावRavikant Tupkarरविकांत तुपकर