शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चिखलीत राडा, दगडफेकीत चार पोलिस जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2019 00:02 IST

धोत्रा भनगोजी येथील नेत्यांच्या भाषणाचे पडसाद: दगडफेकीत चार पोलिस जखमी

चिखली: तालुक्यातील धोत्रा भनगोजी येथील कार्यक्रमा दरम्यान नेत्यांच्या भाषणामधील वक्तव्यावरून काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ झाला. दरम्यान, उभय बाजूंचे कार्यकर्ते पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले असता त्यांच्यात पुन्हा वाद होऊन पोलिस ठाण्यावर दगडफेक झाली. यात  पोलिस उपनिरीक्षक मोहन पाटीलसह तीन पोलिस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे.दरम्यान पोलिसांनी प्रकरणी सौम्य लाठीमार  करत पोलिस ठाण्यासमोर जमलेल्या जमावाला पांगवले. ही घटना २२ फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली.

चिखली तालुक्यातील धोत्रा भनगोजी येथील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती श्वेता महाले व चिखलीचे काँग्रेसचे आ. राहूल बोंद्रे हे ही कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी विकास कामांच्या मुद्द्यावर उभय नेत्यांनी केलेल्या वक्तव्यावरून कार्यकर्त्यांमध्ये वाद होऊन गोंधळ झाला. दरम्यान, तेथील प्रकरण निवळले असे वाटत असतानाच चिखली येथील महाबीज कार्यालयानजीक उभय बाजूंचे कार्यकर्ते पुन्हा आमने-सामनेयेऊन त्यांच्या शाब्दीक वाद झाला. या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती श्वेता महाले या कार्यकर्त्यांसह पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी दाखल झाल्या. त्याचवेळी आमदार राहूल बोंद्रे व त्यांचे कार्यकर्तेही तक्रार देण्यासाठी तेथे आले. त्यामुळे उभय बाजू पुन्हा एकदा समोरा समोर आल्या. यावेळी त्यांच्यात धक्काबुक्रीही झाली. त्यानंतर येथे दगडफेक झाली. त्यात पोलिस उपनिरीक्षकमोहन पाटीलसह तीन पोलिस कर्मचारी जखमी झाले. परिस्थितीचे गांभिर्य पाहता पोलिसांनी जमलेल्या जमावर सौम्य लाठीमार करत हा जमाव पांगवला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर चिखली येथे दंगाकाबू पथक पाठवून पोलिसांची कुमूक वाढविण्यात आली. सध्या येथील परिस्थिती नियंत्रणात असून घटनेचे गांभिर्य पाहता जिल्हा पोलिस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील हे  हीचिखलीत दाखल झाले आहेत. वृत्त लिहीपर्यंत याप्रकरणी रात्री उशिरापर्र्यंत पोलिसात  उभय बाजूकडून तक्रार दाखल झाली नव्हती.या संदर्भात जिल्हा पोलिस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील याच्याशी संपर्क साधला असता आपण चिखलीत दाखल झालो असून संपूर्ण प्रकरणाची माहिती घेत असल्याचे त्यांंनी स्पष्ट केले. दरम्यान, चिखली  पोलिस ठाण्याच्या परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. यासंदर्भात आ. राहूल बोंद्रे व जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती श्वेता महाले यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाbuldhanaबुलडाणाPoliceपोलिस