शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
4
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
5
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
6
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
7
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
8
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
9
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
10
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
11
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
12
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
13
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
14
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
15
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
16
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
17
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
18
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
19
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
20
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  

अकारण बाहेर फिरणाऱ्यांच्या दुचाकी होणार जप्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 4:58 PM

पुढील आदेश होत नाही, तोपर्यंत या बहुतांश दुचाकी पोलिसांच्याच ताब्यात राहणार आहे. 

बुलडाणा: राज्यात कोरोना ससंर्ग झालेल्या व्यक्तींचा आकडा वाढत असतानाच बुलडाणा जिल्ह्यात अकारण दुचाकीवर बाहेर फिरणाऱ्यांवरही आता गंडांतर आले आहे. अशा व्यक्तींच्या दुचाकीच थेट जप्त करण्याचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहे.बुलडाण्यात १९ एप्रिल रोजी रात्री उशिरा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात घेण्यात आलेल्या बैठकीनंतर  गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अनुषंगीक आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांना दिले आहेत. दरम्यान, संपलेल्या आठवड्यापर्यंत बुलडाणा जिल्ह्यात दुचाकीवर अकारण फिरणाºया तब्बल पाच हजार १९४ व्यक्तीवर पोलिस विभागाने कारवाई करून त्यांच्या दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत. परिणामी आता जोपर्यंत पुढील आदेश होत नाही, तोपर्यंत या बहुतांश दुचाकी पोलिसांच्याच ताब्यात राहणार आहे. त्यामुळे आगामी काळातही अकारण रस्त्यावर दुचाकीवरून फिरणाºया व्यक्तींच्याही दुचाकी जप्त करण्याचा सपाटा पोलिसांनी सुरू केला आहे. थेट गृहमंत्र्यांनीच याबाबत मोकळी दिल्याने पोलिसांचेही मनोबल आता वाढले आहे.असे असले तरी संचारबंदीच्या काळात बुलडाणा जिल्ह्यात विविध स्वरुपाचे जवळपास ७२८ गुन्हे घडले आहेत. त्यामध्ये जवळपास ९४३ व्यक्तींवर पोलिसांनी कारवाई केली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. सोशल मिडीयावरही अफवा पसरविणाºया नऊ जणांविरोधात बुलडाणा जिल्ह्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर सेलचीही त्यामुळे जिल्ह्यात समाजमाध्यमावर नेमका काय ट्रेन्ड सुरू आहे, अफवा पसरविणाºया पोस्टसह अशा व्यक्तींचेही ट्रॅकींग पोलिस प्रशासनाकडून सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सोशल मिडीयावर पसरणाºया अफवांवर लक्ष ठेवून दोषींवर कारवाई करण्यासाठी पोलिसांचा एक विभागच सक्रीय झाला आहे. सायबर क्राईमचे आयजी मिलींद भारंबे प्रामुख्याने या संपूर्ण बाबी हाताळत असून राज्यात आतापर्यंत २४१ व्यक्तींवर अनुषंगीक विषयान्वये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाtraffic policeवाहतूक पोलीस