अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
By संदीप वानखेडे | Updated: February 2, 2024 18:20 IST2024-02-02T18:18:26+5:302024-02-02T18:20:04+5:30
१ फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास शेलापूरजवळ घडली. साफल्यकुमार अंबादास घाडगे असे मृतकाचे नाव आहे.

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
मोताळा : भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना १ फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास शेलापूरजवळ घडली. साफल्यकुमार अंबादास घाडगे असे मृतकाचे नाव आहे.
चिखली तालुक्यातील सातगाव भुसारी येथील साफल्यकुमार घाडगे हे त्यांच्या एम.एच. २८/ ए. डब्ल्यू. / ००७२ क्रमांकाच्या दुचाकीने १ फेब्रुवारी रोजी कामानिमित्त मलकापूरकडे आले होते. दरम्यान रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास शेलापूरजवळ अज्ञात भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली होती़ या धडकेत दुचाकीवरील साफल्यकुमार घाडगे यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. या अपघातात मृतकाच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोहेकॉ नंदकुमार धांडे, पोकॉ प्रमोद साळोखे यांच्यासह बोराखेडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून प्रेत शवविच्छेदन करण्यासाठी बुलढाणा सामान्य रुग्णालयात हलविले हाेते़ या प्रकरणी बोराखेडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.