बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 13:48 IST2019-07-08T13:46:11+5:302019-07-08T13:48:12+5:30
बसने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली.

बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
ठळक मुद्देविक्की मोरे असे मृतक युवकाचे नाव आहे. अकोलाकडे जाणाºया बसने मोटारसायकलला जबर धडक दिली. ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
खामगाव : बसने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी सकाळी १०.४५ वाजता खामगाव ते अकोला राष्ट्रीय महामार्गावर एका हॉटेलसमोर घडली. विक्की मोरे असे मृतक युवकाचे नाव आहे.
खामगाव येथून अकोलाकडे जाणाºया बसने समोरील विना क्रमांकाच्या मोटारसायकलला जबर धडक दिली. यात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. विक्की मोरे असे मृतक युवकाचे नाव असून तो टेंभूर्णा येथील रहिवाशी असल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच, ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह सामान्य रूग्णालयात आणण्यात आला. (प्रतिनिधी)