भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार; खामगाव चिखली रस्त्यावरील घटना
By अनिल गवई | Updated: October 4, 2023 22:26 IST2023-10-04T22:25:23+5:302023-10-04T22:26:34+5:30
एक युवक गंभीर जखमी.

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार; खामगाव चिखली रस्त्यावरील घटना
अनिल गवई, लोकमत न्यूज नेटवर्क, खामगाव: भरधाव कारने समोरासमाेर धडक दिल्याने दुचाकीवरील एक युवक ठार तर एक युवक गंभीर जखमी झाला. ही घटना खामगाव चिखली रस्त्यावरील अंत्रज गावाजवळ सायंकाळी ५ वाजता दरम्यान घडली. या घटनेमुळे खामगाव चिखली रस्त्यावरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती.
याबाबत कचरू परबत चव्हाण (८० रा. अंत्रज) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते नातवासोबत एमएच २८ एएल ९१६९ या क्रमांकाच्या दुचाकीने डबलसीट शेतातील काम आटोपून घरी जात होते. तर दुसर्या दुचाकीवर त्यांच्या नातवाचा मित्र जात होता. त्यावेळी समोरून येणार्या एमएच २८ बीक्यू ९२८३ च्या चालकाने आपल्या ताब्यातील कार भरधाव वेगाने चालवित दोन्हीदुचाकीला जबर धडक दिली. यात चव्हाण यांचा नातू नरेश पांडुरंग चव्हाण (२२) हा ठार झाला. तर मुन्ना रमेश चव्हाण याला जखमी केल्याचे तक्रारीत नमूद केले.
या तक्रारीवरून खामगाव ग्रामीण पोलीसांनी भादंवि कलम २७९,३०४ (अ), ३३७, ३३८, ४२७ भादंवि सह. १३४/१७७ मो.वा.का. अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास खामगाव ग्रामीण पोलीस करीत आहेत.