महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त दुचाकी रॅली

By अनिल गवई | Updated: April 22, 2023 12:13 IST2023-04-22T12:13:16+5:302023-04-22T12:13:54+5:30

शनिवारी खामगावातून भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली

Bike rally on the occasion of Mahatma Basaveshwar Jayanti | महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त दुचाकी रॅली

महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त दुचाकी रॅली

अनिल गवई, लोकमत न्यूज नेटवर्क, खामगाव (जि. बुलढाणा): सामाजिक समरसतेचे अग्रदूत महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त शनिवारी खामगावातून भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली. या रॅलीद्वारे महात्मा बसवेश्वरांना अभिवादन करण्यात आले.

स्थानिक जगदंबा रोड, जलालपुरा येथील महात्मा बसवेश्वर चौकातून या रॅलीला सकाळी साडेनऊ वाजता सुरूवात झाली. शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण केल्यानंतर या रॅलीचा समारोप करण्यात आला. महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त निघालेल्या दुचाकी रॅलीचे खामगाव शहरात विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्षाच्या पुढार्यांकडून स्वागत करण्यात आले. महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठान आणि लिंगायत समाज बांधवांच्यावतीने आयोजित दुचाकी रॅलीत युवकांनी प्रतिसाद दिला. दुचाकी रॅलीच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी स्वागत कमानी आणि फलक लावण्यात आले होते. शंभरावर दुचाकीघेऊन समाजबांधव शिस्तीत या रॅलीत सहभागी झाले होते. यावेळी महात्मा बसवेश्वर यांचा जयघोष करण्यात आला. प्रसाद वितरणानंतर या रॅलीचा समारोप करण्यात आला.

Web Title: Bike rally on the occasion of Mahatma Basaveshwar Jayanti