ट्रकने कट मारल्यामुळे दुचाकी अनियंत्रित, दोघे जखमी
By अनिल गवई | Updated: January 8, 2024 19:40 IST2024-01-08T19:40:27+5:302024-01-08T19:40:43+5:30
आंबेटाकळी बोरी अडगाव रस्त्यावरील घटना.

ट्रकने कट मारल्यामुळे दुचाकी अनियंत्रित, दोघे जखमी
खामगाव : पेट्रोल भरून जात असलेल्या युवकांच्या दुचाकीला अज्ञात ट्रकने कट मारला. त्यामुळे दुचाकी अनियंत्रित होऊन झालेल्या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले. आंबेटाकळी बोरीअडगाव रस्त्यावर सोमवारी सकाळी ही घटना घडली.
याबाबत सविस्तर असे की, अटाळी येथील शुभम तानाजी मुंढे (२५) व किरण सुरेश गवई (१८) पेट्रोल भरून शहापूरकडे जात होते. दरम्यान, आंबेटाकळी ते बोरीअडगाव रोडवर त्याच्या दुचाकीला अज्ञात ट्रकने कट मारला. त्यामुळे चालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दोघेही खाली पडून गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच नातेवाईक तसेच प्रत्यक्षदर्शींनी त्यांना तातडीने खामगाव येथील सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले.