शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
3
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
4
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
5
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
6
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
7
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
8
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
9
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
10
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
11
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
12
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
13
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
14
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
15
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
17
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
18
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
19
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
20
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना

खासदार राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचे मोठे षडयंत्र!

By अनिल गवई | Updated: April 4, 2023 15:22 IST

खामगावात काँग्रेस नेत्यांचा पत्रपरिषदेत आरोप: मोदींची प्रवृत्ती हिटलरशाहीला प्रोत्साहन देणारी

लोकमत न्यूज नेटवर्क, खामगाव: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गत काही कालावधीत घेतलेल्या भूमिकेमुळे सत्ताधार्याच्या पायाखालची वाळू सरकली आहे. भारतीय समाज आणि जनतेत राहुल गांधीमध्ये एक सक्षम पर्याय दिसून येत असल्याने सत्ताधार्यांनी राजकीय षडयंत्रातून राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली. ही बाब निषेधार्ह असून मोदींची प्रवृत्ती हिटलरशाहीला प्रोत्साहन देणारी असल्याचे  माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी येथे सांगितले. 

खामगाव येथील शासकीय विश्राम गृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेला काँग्रेस प्रदेश सचिव रामविजय बुरूगंले, शहर काँग्रेस कमेटीच्या अध्यक्षा सरस्वती खासने, तालुकाध्यक्ष मनोज वानखडे, शेगाव काँग्रेसचे शहराध्यक्ष विजय काटोले, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा भारती पाटील, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा सुरजीतकौर सलुजा, माजी नगरसेवक िकशोर आप्पा भोसले, इनायत उल्ला खान,  युवक काँग्रेसचे अध्यक्ष रोहित राजपूत, संजय झुनझुनवाला, मंगेश इंगळे, श्रीकांत तायडे,  विनोद मिरगे, निखिल देशमुख, प्रशांत टिकार, लक्ष्मण गवई,आदींची उपस्थिती होती.

सत्ताधार्याच्या मर्जीतील उद्योजक आणि नेत्यांचे मोठे घोटाळे उघडकीस आणल्यामुळे राहुल गांधी यांना लक्ष्य केले जात आहे. भांडवलदार उद्योगपतींच्या कर्ममापविरोधात त्यांनीआवाज उठविला आहे. भारतीय बँकांच्या थकबाकीदारांच्या लुटी विरोधात , एसबीआय एलआयसीच्या पैशांचा गैरवापर आदी घोटोळे त्यांनी उघडकीस आणले. संसदेत आवाज उठविला. भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून सामान्यांशी नाळ जोडण्याचा प्रयत्न चालविला. यामुळे पोटशूळ उठलेल्या सत्ताधार्यांनी त्यांची खासदारकी रद्द केली. इतकेच नव्हेतर   द्वेषातून त्यांना बंगलाही खाली करायला लावला. ही बाब निषेधार्ह असल्याचेही सानंदा यांनी पत्र परिषदेत स्पष्ट केले.जय भारत सत्याग्रहाला सुरूवात

कॉग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधातील षडयंत्राविरोधात घरोघरी जनजागृती करण्यासाठी मंगळवारी खामगाव येथून जय भारत सत्याग्रहाला सुरूवात करण्यात आली. यावेळी मशाल पेटवित आगामी काळात संघर्ष करण्याचा निर्धार या पत्रकार परिषदेत माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी केला.

त्यांच्याबद्दल रोष नाही...पण त्यांची संगत चुकीची..!

खामगाव विधानसभा मतदार संघातील पराभूत उमेदवार ज्ञानेश्वर उपाख्य नाना पाटील  यांचा उमेदवार म्हणून  माजी आमदार दिलीपकुमार यांनीच शोध लावला. राणानानाची जोडी मतदार संघात चर्चेत येण्यापूर्वीच दोघांमध्ये बिनसले. आता दोन्ही नेत्यांमध्ये ताटातूट झाली. पत्रकार परिषदेत एका प्रश्नावर सानंदा यांना छेडले असता, त्यांनी त्यांच्याबद्दल रोष नाही, काँग्रेसशी त्यांचा काही संबंध नाही पण अलिकडे त्यांची संगत चुकली आहे. मोठे नेते असल्यानंतरही कार्यकर्त्यांच्या हक्कावर गदा आणणे त्यांना शोभणारे नाही.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी