दुभाजकावर आदळून दुचाकीस्वार गतप्राण; खामगाव-नांदुरा रोडवरील शनिवारी दुपारची घटना
By अनिल गवई | Updated: May 18, 2024 16:34 IST2024-05-18T16:33:15+5:302024-05-18T16:34:23+5:30
भरधाव दुचाकी रस्ता दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला.

दुभाजकावर आदळून दुचाकीस्वार गतप्राण; खामगाव-नांदुरा रोडवरील शनिवारी दुपारची घटना
अनिल गवई, खामगाव: भरधाव दुचाकी रस्ता दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला. खामगाव-नांदुरा रस्त्यावरील एका इंडस्ट्रीजसमोर ही घटना शनिवारी दुपारी १२:३० वाजताच्या दरम्यान घडली.
प्राप्त माहितीनुसार, आनंद वसंत कुळकर्णी शनिवारी दुपारी दुचाकीने शहराकडे येत होते. दरम्यान, सुटाळानजीक असलेल्या इंडस्ट्रीजसमोर त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे दुचाकी रस्ता दुभाजकावर आदळली. यात डोक्याला इजा पोहोचल्याने ते गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत त्यांना खामगाव येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. तेथे तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.