बिबी शिवारात वीज कोसळून दोन गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 01:21 IST2017-10-14T01:20:51+5:302017-10-14T01:21:00+5:30

बिबी : बिबी येथील शिवारात सोयाबीन सोंगणीचे काम करीत असताना शेतमजूर पती पत्नी दाम्पत्यावर वीज कोसळून ते गंभीर जखमी झाल्याची घटना १३ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजताच्या दरम्यान घडली.

Bibi Shivtar's power collapse two serious | बिबी शिवारात वीज कोसळून दोन गंभीर

बिबी शिवारात वीज कोसळून दोन गंभीर

ठळक मुद्दे शेतमजूर पती पत्नी गंभीर जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क
बिबी : बिबी येथील शिवारात सोयाबीन सोंगणीचे काम करीत असताना शेतमजूर पती पत्नी दाम्पत्यावर वीज कोसळून ते गंभीर जखमी झाल्याची घटना १३ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजताच्या दरम्यान घडली.
शुक्रवारला विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. त्यामध्ये कुंबेफळ येथील बाळू तुकाराम चव्हाण (४२) व त्यांची पत्नी अनिता चव्हाण (३८) हे दाम्पत्य सोंगलेली सोयाबीन गोळा करत असताना अचानक वीज कोसळून गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर बिबी येथील ग्रामीण रुग्णालयात डॉ.भटकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरु आहेत.  घटनेची माहिती मिळताच अभय चव्हाण यांनी जखमींना भेटून विचारपूस केली. 

Web Title: Bibi Shivtar's power collapse two serious

टॅग्स :Rainपाऊस