मिरवणुकीमध्ये नाचण्याच्या वादातून मारहाण; तिघांवर गुन्हा

By संदीप वानखेडे | Updated: March 11, 2023 17:55 IST2023-03-11T17:55:49+5:302023-03-11T17:55:59+5:30

शहरात निघालेल्या मिरवणुकीत नाचता नाचता धक्काबुक्की केल्याची घटना सांगायला जाणाऱ्या व्यक्तीला तिघांनी बेदम मारहाण केली.

Beatings over a dispute over dancing in a procession; A crime against three | मिरवणुकीमध्ये नाचण्याच्या वादातून मारहाण; तिघांवर गुन्हा

मिरवणुकीमध्ये नाचण्याच्या वादातून मारहाण; तिघांवर गुन्हा

मोताळा - शहरात निघालेल्या मिरवणुकीत नाचता नाचता धक्काबुक्की केल्याची घटना सांगायला जाणाऱ्या व्यक्तीला तिघांनी बेदम मारहाण केली. यामध्ये संतोष चव्हाण हे जखमी झाले असून, त्यांना पुढील उपचारासाठी बुलढाणा येथे पाठविण्यात आले आहे. ही घटना मोताळा शहरातील वृंदावन नगर येथे १० मार्चला रात्री ८ वाजता घडली. या प्रकरणी बाेराखेडी पाेलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मोताळा शहरामध्ये १० मार्च रोजी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी नाचता नाचता फिर्यादी संताेष चव्हाण यांचा मुलगा महेंद्र याला निखिल विनोद गावंडे व मनोज गावंडे यांनी धक्काबुक्की केली. याबाबत फिर्यादी चव्हाण यांनी तुमच्या मुलांनी नाचताना धक्काबुक्की केली असे समजून सांगण्यासाठी गेले असता वाद घालत मनोज विनोद गावंडे व निखिल गावंडे यांनी मारहाण केली़, तसेच विनोद गावंडे याने हातातील मार्बलच्या कडप्प्याने फिर्यादीच्या डोक्यावर मारून जखमी केले.

यामध्ये गंभीर जखमी झालेल्या संताेष चव्हाण यांच्या फिर्यादीवरून बोराखेडी पाेलिसांनी निखिल विनोद गावंडे, विनोद गावंडे, मनोज विनोद गावंडे यांच्याविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास विजयकुमार घुले करीत आहेत.

Web Title: Beatings over a dispute over dancing in a procession; A crime against three