न्यायालयाच्या आवारात मारहाण; गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 14:18 IST2020-01-31T14:18:35+5:302020-01-31T14:18:56+5:30

अरूण चांडक याने पकड़न ठेवले तर बालकिसन चांडक याने काठीने मारहाण करून जखमी केले.

Beatings in court premises; case Filed | न्यायालयाच्या आवारात मारहाण; गुन्हा दाखल

न्यायालयाच्या आवारात मारहाण; गुन्हा दाखल

खामगाव : न्यायालयात अटक वॉरन्ट रद्द करण्यासाठी आलेल्या दोघांनी फियार्दीस पाहून कोर्टाच्या आवारात काठीने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली.
हरीषकुमार केशवलाल भिमजयानी (६६) रा. केशव नगर यांनी शहर पोस्टेला तक्रार दिली की, २९ जानेवारी दुपारी ते कोर्टामध्ये वैयक्तिक कामानिमित्त गेले होते. यावेळी त्याठिकाणी बालकिसिन बन्सिलाल चांडक व त्यांचा मुलगा अरूण चांडक दोघे रा. हिम्मत नगर, गुजरात हे १४ फेब्रुवारी २०२० चा अटक वॉरन्ट रद्द करण्यासाठी आले असता त्यांनी मला पाहून 'तु माझे विरोधात केलेली केस मागे घे' असे म्हणून वाद घातला व अरूण चांडक याने पकड़न ठेवले तर बालकिसन चांडक याने काठीने मारहाण करून जखमी केले. या तक्रारीवरून पोलिसांनी उपरोक्त दोघांविरूध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Beatings in court premises; case Filed