जेवणाच्या बिलावरून हॉटेल मालकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 11:54 IST2021-03-24T11:54:22+5:302021-03-24T11:54:37+5:30

Beating hotel owner over meal bill एका हॉटेलवर सोमवारी  सायंकाळी हरिओम उर्फ नंदू चव्हाण याच्यासह तिघांनी जेवण केले.

Beating hotel owner over meal bill | जेवणाच्या बिलावरून हॉटेल मालकास मारहाण

जेवणाच्या बिलावरून हॉटेल मालकास मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : जेवणाचे बिल न देता निघून जाणाऱ्यांना हटकले असता तिघांनी हॉटेल मालकास मारहाण करून त्यांच्याजवळील मोबाईल हिसकावून पोबारा केला, ही घटना सोमवारी सायंकाळी घडली. 
येथील शेगाव रोडवरील एका हॉटेलवर सोमवारी  सायंकाळी हरिओम उर्फ नंदू चव्हाण याच्यासह तिघांनी जेवण केले. त्यानंतर ते पैसे न देताच तेथून निघून गेले. यावेळी हॉटेल मालक दिनेश रामभाऊ शेगोकार (३८) यांनी पाठलाग करुन त्यांना थांबविले व जेवणाचे पैसे मागीतले. यावरून त्यांनी त्यांच्याशी वाद घालून चापट-बुक्क्यांनी व बेल्टने मारहाण केली. तसेच शेगोकार यांच्या खिशातील मोबाईल हिसकावून घेत तेथून पोबारा केला. याबाबत शेगोकार यांनी शहर पोस्टेला तक्रार दिली असून याप्रकरणी पोलिसांनी हरिओम उर्फ हरीश नंदू चव्हाण याच्यासह तिघांविरुध्द कलम ३९४, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Beating hotel owner over meal bill