सिंदखेडराजा ठाण्यात बीटनिहाय कक्ष स्थापन होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:31 IST2021-03-22T04:31:02+5:302021-03-22T04:31:02+5:30

पोलीस निरीक्षक जयवंत सातव व सहायक पोलीस अधिकाऱ्यांच्या विचारातून ही संकल्पना मांडली गेली. हे संपूर्ण काम लोकसहभागातून पूर्ण झाले ...

A beat-wise cell will be set up at Sindkhedraja Thane | सिंदखेडराजा ठाण्यात बीटनिहाय कक्ष स्थापन होणार

सिंदखेडराजा ठाण्यात बीटनिहाय कक्ष स्थापन होणार

पोलीस निरीक्षक जयवंत सातव व सहायक पोलीस अधिकाऱ्यांच्या विचारातून ही संकल्पना मांडली गेली. हे संपूर्ण काम लोकसहभागातून पूर्ण झाले असल्याचे सातव यांनी सांगितले. आलेले तक्रारदार, अभ्यागत यांना स्टेशन इमारतीत जागा अपुरी असल्याने बाहेर मैदानात ताटकळत बसावे लागत होते, तर शांतता कमिटी मीटिंग असो किंवा स्टेशनअंतर्गत घेतले जाणारे कार्यक्रम, इन्स्पेक्शन यासाठी स्वतंत्र पेंडॉल टाकावा लागत होता. आता मात्र भव्य टीन शेड व त्यातच आडगावराजा, जळपिंपळ गाव, धांदरवडी आणि सिंदखेडराजा या चार ठिकाणच्या तक्रारदार किंवा अभ्यागतांना आपल्या ठाणे अमलदारांसोबत स्वतंत्र कक्षात बसून आपले म्हणणे सांगता येणार आहे.

दरम्यान, शुक्रवारी अतिरिक्त पोलीस अधीक्षक बनसोडे यांनी पोलीस स्टेशनला भेट दिली असता त्यांनीही या कामाचे कौतुक केले.

Web Title: A beat-wise cell will be set up at Sindkhedraja Thane