बुलडाणा- मलकापूर मार्गावर अस्वलांचा वावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 18:03 IST2021-02-24T18:03:21+5:302021-02-24T18:03:27+5:30
Bear in Buldhana पहाटे फिरण्यास जाणाऱ्यांनी दोन जणांनी या अस्वलांना बुद्धविहार परिसरात रस्ता अेालांडतांना पाहले आहे.

बुलडाणा- मलकापूर मार्गावर अस्वलांचा वावर
बुलडाणा: मलकापूर मार्गावर आरटीअेा ऑफीस ते बुद्धविहार परिसरात अस्वलांचा वावर असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. २४ फेब्रुवारी रोजी या मार्गावर पहाटे फिरण्यास जाणाऱ्यांनी दोन जणांनी या अस्वलांना बुद्धविहार परिसरात रस्ता अेालांडतांना पाहले आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी या भागात पहाटे तथा सायंकाळी फिरण्यास जातांना सतर्कता बाळगण्याची गरज आहे.यापूर्वीही या भागात बिबट्याचे दर्शन काहींना झाले होते. २४ फेब्रुवारी रोजी प्रदीप डांगे व त्यांचे सहकारी सकाळी ६:३० वाजेच्या सुमारास मॉर्निंग वॉकला जात असताना त्यांना ही अस्वलाची जोडी दृष्टीपथास पडली. ती त्यांनी त्यांच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली.
दुसरीकडे मलकापूर रोडलगतच हनवतखेड मार्गावर बुलडाणा पालिकेचा कचरा डेपो आहे. या कचरा डेपोच्या परिसरातही तीन ते चार अस्वल पहाटे तथा सायंकाळ दरम्यान अधुनमधून आढळून येत आहे. त्यामुळे या भागात फिरतांना नागरिकांनी अधिक सतर्कता बाळण्याची गरज आहे.