शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

बीट जमादार बाठे अखेर निलंबित!;जिल्हा पोलीस अधिक्षकांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 20:13 IST

पोलीस स्टेशनमध्ये पैसे स्वीकारल्याचा व्हीडीओ सोशल मिडीयावर व्हायरल प्रकरणी संबधीत बिट जमादार निवृत्ती बाठे यांना सोमवारी तडकाफडकी निलंबित करण्यात आले.

खामगाव : पोलीस स्टेशनमध्ये पैसे स्वीकारल्याचा व्हीडीओ सोशल मिडीयावर व्हायरल प्रकरणी संबधीत बिट जमादार निवृत्ती बाठे यांना सोमवारी तडकाफडकी निलंबित करण्यात आले. याप्रकरणी पिंपळगाव राजा पोलिस स्टेशनचे ठाणेदार निखिल फटींग यांच्यावरही कारवाई प्रस्तावित आहे. त्यामुळे पोलिस विभागात एकच खळबळ उडाली आहे.खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा पोलिस स्टेशनतंर्गत भंडारी येथे  एकाच समाजातील दोन गटामध्ये तेढ निर्माण झाले. याप्रकरणी दाखल गुन्ह्यात महिलांची अटक लांबणीवर टाकण्यासाठी तसेच महिलांचा पीसीआर न काढण्यासाठी बीट जमादार निवृत्ती बाठे यांनी भंडारी येथील राहुल मंगलगिर मच्छरे यांना पैशांची मागणी केली. त्यानुसार ३ नोव्हेंबर रोजी पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनमधील मागील बाजूस असलेल्या खोलीत पैसे स्वीकारले.  या संपूर्ण घटनाक्रमाचा व्हीडीओ सोशल मिडीयावर शनिवारी व्हायरल झाला. रविवारी प्रसिध्दी माध्यमातही वृत्त झळकले. त्यामुळे पित्त खवळलेल्या बीट जमादार बाठे याने राहुल मंगलगिर मच्छरे रा. भंडारी यांच्यासह व्हीडीओ क्लीप काढणा-यासह तीन साक्षीदारांना धमकी दिल्याचा प्रकार सोमवारी समोर आला. याप्रकरणी जिल्हा पोलिस अधिक्षकांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. प्रसिध्दी माध्यमात झळकलेल्या वृत्ताची तसेच अन्यायग्रस्तांच्या तक्रारींची गंभीर दखल घेत, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी संबंधित बीट जमादार निवृत्ती एकनाथ बाठे यांना तडकाफडकी निलंबित केले. तर ठाणेदार निखिल फटींग यांच्यावर प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्यात आली. या कारवाईमुळे पोलीस विभागात एकच खळबळ उडाली असून, खाबुगिरी करणा-या पोलीस कर्मचारी आणि अधिका-यांचे धाबे दणाणले आहे.

- पिंपळगाव राजा पोलिसांच्या खाबुगिरीचा व्हीडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर सर्वप्रथम आॅनलाईन ‘लोकमत’ला हे वृत्त प्रसारीत झाले. सोमवारी ‘लोकमत’मध्येही हे वृत्त ठळकपणे झळकले. या वृत्तांची गंभीर दखल घेत, जिल्हा पोलिस अधिक्षकांनी पोलिसांची छबी सुधारण्यासाठी संबंधित पोलिस कर्मचा-यावर तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली.

पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनचे बीट जमादार बाठे यांना निलंबित करण्यात आले आहे. ठाणेदार फटींग यांच्यावरही प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्यात आली. याप्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे.- डॉ. दिलीप पाटील-भुजबळजिल्हा पोलिस अधिक्षक, बुलडाणा

सोशल मिडीयावर व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर आपल्यासह सहका-यांचे आयुष्य बरबाद करण्याची धमकी संबंधित बीट जमादाराने दिली होती. प्रकरण आपसात मिटविण्यासाठीही आपल्यासह कुटुंबियांवर दबाव आणल्या जात होता. आता पोलिसांकडून आपल्याला सहकार्य मिळावे, ही अपेक्षा आहे.-राहुल मच्छरेअन्यायग्रस्त, भंडारी, ता. खामगाव. 

टॅग्स :Policeपोलिसbuldhanaबुलडाणा