शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

पीक कर्ज वाटपाचा टक्का वाढण्यात थकबाकीचा अडसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 3:03 PM

वनटाईम सेटलमेंट न केल्याने तथा कर्जमाफीनंतरच्या वर्षातील कर्ज थकित असल्याने शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यात अडचणी येत आहे.

ठळक मुद्दे एक हजार ७७३ कोटी ७७ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उदिष्ट आहे. १९ हजार ८९५ शेतकºयांना १६१ कोटी ८६ लाख २२ हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.बँकांनी १७.२० टक्के शेतकºयांना जुलै महिन्याच्या मध्यावर पीक कर्ज वाटप केल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.

- नीलेश जोशी  लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शेतकरी कर्ज माफी योजनेतंर्गत वनटाईम सेटलमेंट न केल्याने तथा कर्जमाफीनंतरच्या वर्षातील कर्ज थकित असल्याने शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यात अडचणी येत आहे. परिणामी पीक कर्ज वाटपाचा टक्का फारसा पुढे सरकला नसल्याचे वास्तव समोर आले आहे. दरम्यान, पात्र एक लाख १५ हजार ६४२ शेतकऱ्यांचा विचार करता प्रत्यक्षात बँकांनी १७.२० टक्के शेतकºयांना जुलै महिन्याच्या मध्यावर पीक कर्ज वाटप केल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यात तीन लाख ३३ हजार ९६५ शेतकºयांना चालू आर्थिक वर्षात एक हजार ७७३ कोटी ७७ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उदिष्ट आहे. यापैकी १२ हजार ४९६ शेतकरी नियमित कर्ज भरणारे आहे तर ७१ हजार ३५१ शेतकरी पीक कर्ज पूनर्गठणासाठी पात्र आहेत तर चार हजार ६८४ शेतकºयांनी पीक कर्जाचे पूर्नगठण करण्यास होकार दिलेले आणि अन्य काही असे मिळून प्रत्यक्षात एक लाख १५ हजार शेतकरी हे नव्याने पीक कर्ज मिळण्यासाठी पात्र ठरलेले आहेत. अशा शेतकºयांपैकी १९ हजार ८९५ शेतकºयांना १६१ कोटी ८६ लाख २२ हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. त्याची टक्केवारी ही १७.२० टक्के येते. मात्र पीक कर्जाच्या उदिष्टाचा विचार करता ही टक्केवारी ९ टक्क्यांच्या आसपास असली तरी शेतकºयांकडे कर्जमाफी झाल्यानंतरच्या वर्षातील पीक कर्जाची रक्कम थकित असल्याने जवळपास एक लाख ११ हजार ८८५ शेतकºयांना पीक कर्ज वाटप करण्यात अडचणी येत आहेत. त्या सोबतच छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेनंतर्गत कर्जमाफी मिळाल्यानंतरही २५ हजार ६४१ शेतकºयांनी त्यांच्या कर्जाचे वनटाईम सेटलमेंट केलेले नाही. योजनेतंर्गत कर्जमाफी मिळाली मात्र त्याचा लाभ न घेतलेले ४७ हजार ९९९ शेतकरी जिल्ह्यात आहे. या सर्व शेतकºयांचा एकत्रीत विचार करता एक लाख ८५ हजार ५२५ शेतकºयांना पीक कर्ज वाटपात अडचणी निर्माण झाल्या आहेत.बँक निहाय पीक कर्ज वाटपाचा टक्का पाहता सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी दहा हजार २०३ शेतकºयांना ७८ कोटी ९६ लाख रुपयांचे, खासगी अर्थात व्यापारी बँकांनी दोन हजार २२४ शेतकºयांना ३६ कोटी २५ लाख ४६ हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप केलेले आहे. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने दोन हजार ६५९ शेतकºयांना २२ कोटी ५० लाख ५३ हजार रुपयांचे पीक कर्ज जुलै महिन्याच्या मध्यावर वाटप केलेले आहे.दरम्यान, जिल्हा सहकारी बँकेनेही पीक कर्ज वाटपात आघाडी घेतली असून चार हजार ८०९ शेतकºयांना २३ कोटी १४ लाख ४३ हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप केलेले आहे.शेतकºयांना पीक कर्ज वाटपासाठी सप्टेंबर अखेरपर्यंतची मुदत आहे. त्यातच जुलै महिन्यात जिल्ह्यात पावसाने चांगली हजेरी लावल्याने जवळपास ७० टक्के पेरण्या पूर्णत्वास गेल्या आहेत. त्यामुळे या काळात शेतकºयांना आता खºया अर्थाने पैशांची निकड आहे. त्यामुळे बँकांनी शेतकºयांना त्वरेने पीक कर्ज वाटप करावे यासाठी रेटा वाढविण्याची गरज आहे.पुनर्गठणासाठी हवी संमतीजिल्ह्यातील ७१ हजार ३५१ शेतकरी हे पीक कर्जाच्या पूनर्गठणासाठी पात्र आहेत. जवळपास ५५४ कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे यंदा वाटप करावयाचे आहे. मात्र पीक कर्जाचे पूनर्गठन करावयाचे असल्यास संबंधीत शेतकºयांची त्यासाठी संमती लागणार आहे. ७१ हजार ३५१ शेतकºयांपैकी आतापर्यंत चार हजार ६८४ शेतकºयांनीच असी संमती दिली असल्याचे अग्रणी बँकेची आकडेवारी स्पष्ट करते. दरम्यान, ३१ जुलै २०१९ पूर्वी २०१८ च्या खरीप हंगामातील पीक कर्जाच्या पुनर्गठनाची कार्यवाही बँकांना करावी लागणार आहे. अनुषंगीक विषयान्वये बँकांनी काटेकोरपणे कार्यवाही करण्याबाबत यापूर्वीच निर्देशीत करण्यात आलेले आहे. राज्यस्तरीय बँकर्स समितीनेही समन्वय ठेवण्याबाबत पुर्वीच सुचीत केले होते.शेतकºयांचे पीक कर्ज पूनर्गठन करावयाचे असल्यास संबंधित शेतकºयांची संमती आवश्यक आहे. सोबतच छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत कर्जमाफी मिळाल्यानंतरच्या वर्षात शेतकºयांनी घेतलेल्या कर्जाची थकबाकी आहे. त्यामुळे प्रत्यक्षात जिल्ह्यात एक लाख १५ हजार ६४२ शेतकरी हे पीक कर्जासाठी पात्र ठरताहेत. अन्य शेतकºयांना पीक कर्ज देताना त्यामुळे अडचणी येत असल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक उत्तम मनवर यांनी दिली.जिल्ह्यातील तीन लाख एक हजार १६७ शेतकºयांना पीक कर्ज वाटपाचे उदिष्ट ठरविण्यात आलेले आहेत. त्यांना एक हजार ७७३ कोटी ७७ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करावयाचे आहे. पैकी एक लाख ११ हजार ८८५ शेतकºयांकडे कर्ज थकित आहे. दरम्यान कर्जमाफी योजनेतंर्गत वनटाईम सेटलमेंटच जिल्ह्यातील २५ हजार ६४१ शेतकºयांनी केलेली नाही. योजनेतंर्गत कर्जमाफी झाल्यानंतर उर्वरित रकमेची शेतकºयांना वनटाईम सेलटमेंट करावी लागणार होती. ती करण्यात आलेली नाही.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrop Loanपीक कर्जFarmerशेतकरीbankबँक