बापरे...नकली सोने तारण ठेवून बँकेची दोन लाखाने फसवणूक
By अनिल गवई | Updated: April 21, 2023 19:10 IST2023-04-21T19:09:56+5:302023-04-21T19:10:23+5:30
बराच कालावधी उलटल्यानंतरही दहिभात याने कर्जाची परतफेड केली नाही. त्यामुळे शंका आल्याने बँकेने गहाण ठेवलेले सोन्याची तपासणी केली.

बापरे...नकली सोने तारण ठेवून बँकेची दोन लाखाने फसवणूक
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: नकली सोने तारण ठेवून कर्ज घेत बँकेची दोन लाखाने फसवणूक केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर बँकेच्या शाखाधिकार्यांसह सोन्याचे मुल्याकन करणार्या सराफाविरोधात शहर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल तक्रारीनुसार तालुक्यातील हिंगणा कारेगाव येथील दत्ता वसंत दहीभात याने आशिष अजय मोरे यांच्याकडून सोन्याचा मुल्यांकन अहवाल घेवून येथील निशांत सोसायटीत सोने तारण ठेवले व बँकेडून १,९९००० रुपयांचे कर्ज घेतले. |त्यानंतर बराच कालावधी उलटल्यानंतरही दहिभात याने कर्जाची परतफेड केली नाही. त्यामुळे शंका आल्याने बँकेने गहाण ठेवलेले सोन्याची तपासणी केली. दरम्यान गहाण ठेवलेले सोने नकली असल्याचे निदर्शनास आले.
त्यानंतर बँकेचे शाखाधिकारी अनिल गिते यांनी शहर पोलीसांत तक्रार दिली. या तक्रारीवरून शहर पोलिसांनी दत्ता वसंत दहीभात व आशिष अजय मोरे यांच्या विरुध्द भादंवि कलम ४२०, ४०९, ४६८, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार झाले आहेत. पुढील तपास खामगाव शहर पोलीस करीत आहेत.