कोरोनाचा उद्रेक वाढला आहे. त्यावर मात करण्यासाठी शासनाने सुरुवातीला संचारबंदी लावली त्याला जनता जुमानली नाही, अखेर आता कठोर निर्बंध लावण्याची वेळ शासनावर आली आहे. चिखली अर्बनने त्याच निर्णयाची अंमलबजावणी करताना आपल्या ग्राहक तसेच ठेवीदारांच्या आरोग्याच्या हिताचा निर्णय घेत ग्राहकांनी सद्य:स्थितीत अत्यावश्यक व महत्त्वाचेच व्यवहार करावे, बँकेत येताना मास्क, सोशल डिस्टन्सिंग आदी सर्व नियमांचे पालन करणे, आदी बाबी करत असतानाच सर्वांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बँकेच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त व संचालक मंडळाने घेतला आहे. याबाबत माहिती देताना सतीश गुप्ता यांनी नोटबंदीच्या काळात देखील चिखली अर्बन बँकेने अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने व्यवहार केल्यामुळे ग्राहकांना कुठलाच त्रास जाणवला नव्हता, तेव्हा ग्राहकांनी चांगले सहकार्य केले होते. त्यामुळे त्या परिस्थितीवर मात केल्या गेली आणि आता या संकटावर देखील मात करण्यासाठी बँकेने वेळेत बदल करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगून कोरोनाची भयंकर स्थिती पाहता महत्त्वाच्या कामाव्यतिरिक्त कोणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन सतीश गुप्त यांनी केले आहे. (वा. प्र.)
ग्राहकांनी ठरवून दिलेल्या वेळेतच बँकेचे व्यवहार करावे : सतीश गुप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:36 IST