खामगावात कारमधून पाच लाखाची बँग लंपास, शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घटना
By अनिल गवई | Updated: November 15, 2023 15:14 IST2023-11-15T15:12:44+5:302023-11-15T15:14:22+5:30
मुख्य रस्त्यावर दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे खामगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे.

खामगावात कारमधून पाच लाखाची बँग लंपास, शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घटना
खामगाव: येथील मुख्य रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलासमोर उभ्या असलेल्या एका कारमधून पाच लाखांची बॅग अज्ञात चोरट्याने लंपास केली. ही घटना मंगळवारी दुपारी एक वाजता दरम्यान घडली. मुख्य रस्त्यावर दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे खामगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत विजय राजाभाऊ चोपडे ५० रा. स्वामी समर्थ मंदिरासमोर खामगाव यांनी शहर पोलीसांत दिलेल्या तक्रारीत नमूद केले की, मंगळवारी दुपारी त्यांच्या चुलत भावाच्या दुकानावरून ५ लाख रुपये घेऊन ते घाटपुरी रोडवरील चोपडे मळ्याच्या दिशेने निघाले.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलासमोर त्यांचे नातेवाईक उभे होते. त्यांच्याशी बोलण्यासाठी एमएच २८ एझेड ३०३३ या कारमधून उतरले. यावेळी संधी साधून त्यांनी कारमध्ये ठेवलेली पाच लाख रूपयांची रक्कम काळ्या रंगाच्या लेदर बॅगसह चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद केले. ही घटना सीसी कॅमेर्यात कैद झाली असून पोलीसांनी याप्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात भादंवि कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास पो.उप.नि. पंकज सपकाळे करीत आहेत.