बाळापूर फैल दगडफेक प्रकरणी ३६ जणांविरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 14:31 IST2020-02-18T14:31:45+5:302020-02-18T14:31:57+5:30
कबड्डीचा सामना सुरू असताना झालेल्या दगडफेक प्रकरणी शहर पोलिसांनी ३६ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

बाळापूर फैल दगडफेक प्रकरणी ३६ जणांविरोधात गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: कबड्डीचा सामना सुरू असताना झालेल्या दगडफेक प्रकरणी शहर पोलिसांनी ३६ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना रविवारी रात्री १०:३० वाजता दरम्यान घडली होती.
शहरातील बाळापूर फैल भागात सुरू असलेल्या कबड्डीच्या सामन्या दरम्यान एका गटाकडून अचानक दगडफेक करण्यात आली. त्याला प्रत्युत्तर म्हणून दुसऱ्या बाजूनेही दगडफेकीस सुरूवात झाली. त्यामुळे पाच जण जखमी झाले. ही घटना रविवारी रात्री १०:३० वाजता दरम्यान घडली होती. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस स्टेशनचे निरिक्षक सुनील अंबुलकर आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. लागलीच उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील आणि अप्पर पोलिस अधिक्षक डॉ. हेमराजसिंह राजपूत घटनास्थळी दाखल होते. परिस्थिती नियत्रंणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. त्यामुळे बाळापूर फैल भागात तणाव निर्माण झाला होता.याप्रकरणी पोहेकॉ गजानन जोशी यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पोलिसांनी ३६ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)