शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
2
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
3
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
4
थंडीची लाट! हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम, एम्सच्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा
5
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
6
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
7
पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'?
8
'निवडणूक आयोग BJP च्या AI टूल्सचा वापर करतोय', SIR वर ममता बॅनर्जींचा संताप
9
Viral Video: लेकीच्या मॉइश्चरायझरची किंमत ऐकून वडिलांची उडाली झोप, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा!
10
अबब! फक्त ४ जणांच्या टीमला Open AI नं ९०० कोटींना खरेदी केले; आता ChatGPT देणार हेल्थ रिपोर्ट
11
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार का? प्रचार संपत असताना अजित पवारांचं मोठं विधान
12
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
13
केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
14
अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
15
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
16
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
17
'हिरव्या पतंगाचा मांजा भगवा तर धनुष्याचा बाण हिरवा, भाजपा, शिंदेसेना आणि MIM एकच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
थ्रिलर फिल्मपेक्षाही भयंकर! जावयासोबत सासूचं सूत जुळलं, अडसर ठरणाऱ्या नवऱ्यालाच संपवलं
19
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, महापालिका निवडणुकीत नवा वाद; प्रचार संपला तरीही उमेदवारांना...
20
गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढलं, तीन दिवसंपासून घसरतोय हा शेअर; आजही 5.58% आपटला, काय म्हणतात एक्सपर्ट?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील अंगणवाडी सेविका भाऊबीज भेटीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 17:19 IST

द्याप अंगणवाडीसेविकांना भाऊबीज भेट मिळाली नाही. 

 लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांना यावर्षी भाऊबीज भेट म्हणून दोन हजार रुपये व गटप्रवर्तकांना तीन हजार रूपये देण्यात येणार असल्याचा आदेश नुकताच राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाने काढला. मात्र अद्याप अंगणवाडीसेविकांना भाऊबीज भेट मिळाली नाही. कोरोना लॉकडाऊनच्या काळात बालकांच्या, मातांच्या पोषण आहाराचा, कुपोषणाचा प्रश्न गंभीर होता. यावेळी दुर्गम भागात चालत जाऊन, नावेने नदी पार करीत अशा विविध अडचणींवर मात करीत अंगणवाडी सेविकांनी घरोघरी पोषण आहार पोहोचवला. स्थलांतरित मजुरांच्या अपत्यांचीही काळजी घेतली. या सगळ्यांमुळेच पोषण माह कार्यक्रमात महाराष्ट्राने देशात अव्वल क्रमांक पटकावला.कोविड-१९ वर मात करण्यासाठी राज्य शासनाने राबविलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या अभियानातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. घरोघरी जाऊन प्रत्येक व्यक्तीची तपासणी केली. यामुळे ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम यशस्वी झाली. यामुळेच राज्याच्या महिला बालकल्याण विभागाच्या वतीने दिवाळीनिमित्त राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांना भाऊबीज भेट म्हणून दोन हजार रुपये देण्यात येणार असल्याचा निर्णय महिला बालकल्याण विभागाच्य वतीने घेण्यात आला. तसेच गटप्रवर्तकांनाही तीन हजार रूपये देण्यात येणार आहे. 

अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांना यावर्षी भाऊबीज भेट म्हणून दोन हजार रुपये व गटप्रवर्तकांना तीन हजार रूपये देण्यात येणार असल्याचा आदेश नुकताच राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाने काढला. मात्र अद्याप अंगणवाडीसेविकांना भाऊबीज भेट मिळाली नाही. शासनासोबतच जिल्हा व तालुका स्तरावरही अधिकाºयांकडून उदासिन धोरण स्वीकारले आहे. - पंजाबराव गायकवाड, जिल्हाध्यक्ष, सीटू संघटना

जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी भाऊबीज भेट म्हणून देण्यासाठीचा निधी कोषागारामध्ये दिला आहे. एक दोन दिवसात हा निधी अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांना मिळेल. - सचिन पाटील, महिला व बालकल्याण अधिकारी

टॅग्स :khamgaonखामगावgovernment schemeसरकारी योजना