शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

पीककर्ज पुनर्गठणास स्टेट बँकेची टाळाटाळ

By admin | Updated: June 6, 2015 00:55 IST

चिखली येथे शेतक-यांसह स्वाभिमानीचा बँकेत ठिय्या.

चिखली ( जि. बुलडाणा) : पेरणीचे दिवस तोंडावर आले असतानाही तालुक्यातील बँकांनी अद्यापपर्यंत पीककर्जाचे पुनर्गठण केलेले नाही. तर याबाबत शासनाचे सक्तीचे आदेश असतानाही शहरातील स्टेट बँकेत कर्ज पुनर्गठणास टाळाटाळ होत असल्याने ५ जून रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्रस्त शेतकर्‍यांसह स्टेट बँकेतील व्यवस्थापकांच्या दालनात ठिय्या दिला व व्यवस्थापकास घेराव घालण्यात आला. याबाबत आक्रमक भूमिका घेतल्याने येत्या ८ जूनपासून पुनर्गठणास सुरुवात करण्याचे आश्‍वासन संबंधितांनी दिले. यावर्षी तत्काळ पीक कर्जाचे वाटप करण्याबाबत जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर यांनी बँकांना आदेशीत केले आहे; मात्र त्याकडे तालुक्यातील राष्ट्रीयीकृत व ग्रामीण बँकांकडून होत आहे. तर पीक कर्जासाठी शेतकरी बँकांचे उंबरठे झिझवून मेटाकुटीला आला आहे. येथील स्टेट बँकेत कर्ज पुनर्गठणासाठी येणार्‍या शेतकर्‍यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन परतून लावण्यात येत आहे. याबाबत निराश झालेल्या शेतकर्‍यांनी याप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यालय गाठले व बँकेच्या अनागोंदी कारभाराची जाणीव करून दिल्याने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन स्वाभिमानीचे भारत वाघमारे व विनायक सरनाईक त्रस्त शेतकरी व कार्यकर्त्यांसह स्टेट बँकेत धडकले व व्यवस्थापक तागडे हे कक्षात उपस्थित नसल्यामुळे याठिकाण ठिय्या देण्यात आला. दरम्यान, बँकेत हजर झालेल्या व्यवस्थापकास स्वाभिमानीचे पदाधिकारी व शेतकर्‍यांनी घेराव घालून कर्ज पुनर्गठणाबाबत धारेवर धरले. तसेच जोपर्यंत पीककर्जाचे पुनर्गठण होत नाही, तोपर्यंंत बँकेतच ठिय्या देण्याचा पावित्रा घेतल्याने व्यवस्थापक तागडे यांनी वरिष्ठांशी चर्चा करून येत्या सोमवारपर्यंत पुनर्गठणाला सुरुवात करण्याचे आश्‍वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.