ऑटो उलटला; सात जखमी

By Admin | Updated: December 25, 2016 02:30 IST2016-12-25T02:30:50+5:302016-12-25T02:30:50+5:30

खामगाव-शेगाव मार्गावरील लासुरा फाट्याजवळ अपघात.

Auto reversed; Seven injured | ऑटो उलटला; सात जखमी

ऑटो उलटला; सात जखमी

खामगाव (जि. बुलडाणा), दि. २४-ऑटो उलटल्याने सात जण जखमी झाल्याची घटना खामगाव-शेगाव मार्गावरील लासुरा फाट्याजवळ शनिवारी घडली.
गोपाळनगरातील रुक्मिणी रमेश बोदडे, सुलोचना नामदेव ठाकरे, आशा पुरुषोत्तम कुलट, श्रीराम तुकाराम खंडारे, नारायण किसनराव हिवाळे, सुरेश आनंदराव टेके ऑटो क्र.एम.एच.२८ टी २८४६ ने शेगाव येथे दर्शनासाठी जात असताना ऑटो चालक प्रफुल्ल गुणवंतराव गावंडे याचा ऑटोवरील ताबा सुटल्याने भरधाव ऑटो रस्त्याच्या कडेला जाऊन उलटला. सदर अपघातात चालकासह उपरोक्त सात जण जखमी झाले.

Web Title: Auto reversed; Seven injured