ऑटोचालकाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 17:08 IST2020-09-19T17:06:50+5:302020-09-19T17:08:52+5:30
गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी साडेसात वाजता घडली.

ऑटोचालकाची गळफास घेऊन आत्महत्या
मलकापूर : तालुक्यातील वडोदा येथील २५ वर्षीय ऑटोचालक युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. वडोदा येथील निलेश शांताराम चोपडे या युवकाने राहत्या घरी दोराच्या साहाय्याने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी साडेसात वाजता घडली. सदर युवक आॅटोरिक्षा चालक असून तो मलकापूर ते वडोदा आॅटो चालवत होता. पोलीस कर्मचारी दीपक बावणे व चंदू गायकवाड यांनी पंचनामा केला आहे. निलेशच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नसून पुढील तपास मलकापूर ग्रामीण पोलिस करत आहेत.