प्रवाशी घेऊन जाणारा ऑटो पलटी, २ युवतींसह ७ महिला जखमी
By अनिल गवई | Updated: February 27, 2023 13:30 IST2023-02-27T13:29:22+5:302023-02-27T13:30:33+5:30
या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस घटनास्थळी पोहोचले.

प्रवाशी घेऊन जाणारा ऑटो पलटी, २ युवतींसह ७ महिला जखमी
बुलडाणा - खामगाव : प्रवासी घेऊन जाणारा ऑटो उलटल्याने दोन युवतींसह सात महिला जखमी झाल्या. सोमवारी सकाळी १० वाजता दरम्यान ही घटना खामगाव बोथाकाजी रस्त्यावर घडली. या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस घटनास्थळी पोहोचले.
यासंदर्भात प्राप्त माहितीनुसार शिर्ला नेमाने येथील सखुबाई राठोड (६०), पर्वतीबाई िकसन राठोड (४५), कोकीळाबाई भानुदास बचे (४०), मीना कालू राठोड (२०), िशवानी परमेश्वर राठोड (२२), अनुसयाबाइृ प्रभुदास राठोड(३८), शंकुतला रामदास बचे (६३) या महिला ऑटोतून प्रवास करीत असताना बोथाकाजी नजीक अचानक ऑटो उलटला. यात सात महिला जखमी झाल्या. घटनेची माहिती मिळताच प्रत्यक्षदर्शी आणि ग्रामस्थांच्या मदतीने पोलीसांनी जखमींना खामगाव येथील सामान्य रूग्णालयात हलविले. डॉक्टरांनी उपचाराअंती गंभीर जखमी असलेल्या सखुबाई राठोड आणि पर्वतीबाई राठोड यांना पुढील उपचारार्थ अकोला येथे हलविण्यात आले. तर शिवानी राठोड यांना खामगाव येथील सामान्य रूग्णालयात भरती करण्यात आले आहे.