युवकाच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 16:10 IST2020-09-06T16:10:53+5:302020-09-06T16:10:59+5:30
काशिनाथ राजाराम उगले (वय ४५ वर्ष) शनिवारी रात्री आरोपी अशोक गणपत भिसे रा. देवधाबा (वय-६६ वर्ष) याच्या घरी दारू पिण्यास गेला होता.

युवकाच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न
देवधाबा : देवधाबा येथे दारूच्या पैशाच्या वादातून युवकाच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी रात्री नऊ ते दहा वाजताच्या दरम्यान घडली. काशिनाथ राजाराम उगले असे जळालेल्या युवकाचे नाव आहे.
काशिनाथ राजाराम उगले (वय ४५ वर्ष) शनिवारी रात्री आरोपी अशोक गणपत भिसे रा. देवधाबा (वय-६६ वर्ष) याच्या घरी दारू पिण्यास गेला होता. त्याला दारू दिली नाही, या कारणाने दोघांमध्ये दारूच्या व पैशाच्या व्यवहारावरून वाद झाला. त्यामध्ये आरोपी अशोक भिसे याने पेट्रोल टाकून पेटवून दिले, अशी तक्रार पोलिसात केली. मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरूद्ध ३०७ नुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आला. पुढील तपास मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पीएसआय तायडे, बिट जमादार विश्वजीत ठाकूर करीत आहेत.
- शेजाºयांनी विझवले
आरोपी अशोक भिसे याचा अवैध दारूचा व्यवसाय आहे. काशीनाथ उगले याला दारूचे व्यसन आहे. दोघांमध्ये वाद झाल्याने भिसे याने पेट्रोल टाकून पेटवून दिले. जळालेल्या अवस्थेत तो घराबाहेर आला. यावेळी शेजारी व जमलेल्या नातेवाईकांनी त्याच्या अंगाला लागलेली आग विझवली. तसेच पुढील उपचारा करीता मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.