शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

‘इटीआयएम’मुळे वैतागले एस.टी. वाहक

By admin | Updated: September 5, 2014 00:19 IST

इलेक्ट्रॉनिक तिकीट इश्यू मशीन उपलब्ध नियमित देखभाल अभावी त्रासदायक ठरत आहेत.

बुलडाणा : आधुनिकतेची कास धरीत एसटी महामंडळाने वाहकांना तिकीट देण्यासाठी इलेक्ट्रॉनिक तिकीट इश्यू मशीन उपलब्ध करून दिल्या. परंतु या मशिनची नियमित देखभाल होत नसल्याने प्रवासात मशीन बंद पडणे, तिकिटाची रक्कम नीट न उमटणे, बसमध्ये चाजिर्ंग उपलब्ध नसणे ह्या समस्या वाहकांना भेडसावत आहेत. यामुळे प्रवासी वाहकांशी वाद घालतात. बरेचवेळा या तिकीटावर पैसे नीट न उमटल्यामुळे हाताने रक्कम लिहून दिल्यास मार्ग तपासणी पथकाचे अधिकारी अशा वाहकावर कारवाई करतात, अशा दुहेरी संकटाचा सामना वाहकांना करावा लागत आहे. एसटीचे वाहक पूर्वी प्रवाशांना ट्रेमधील तिकीट काढून ते पंच करून देत होते. कालांतराने महामंडळाने वाहकांना ह्यईटीआयएमह्ण उपलब्ध करून दिल्या. बुलडाणा विभागात ट्रायमॅक्स कंपनीच्या एकूण ७५४ ह्यईटीआयएमह्ण कार्यरत आहेत. काही काळ ह्या मशिन्स चांगल्या चालल्या. परंतु त्यानंतर या मशिन्सची नियमित देखभाल होत नसल्यामुळे यात तांत्रिक बिघाड होण्याचे प्रमाण वाढले आहेत. ही मशीन बरेचवेळा पूर्णपणे चाजिर्ंग केलेली नसते. त्यामुळे ऐन कामाच्या वेळी मशीन बंद पडते. तिकीटासाठी वारलेल्या कागदाची क्वॉलिटी सुध्दा निकृष्ट असल्यामुळे प्रिंट देताना कागद अडकून एकाच ठिकाणी प्रिंट होते. त्यामुळे प्रवासी वाहकांशी वाद घालतात. काही मशीन मध्ये विविध प्रकारच्या सवलतीच्या पासेसची नोंदही अनेकदा होत नाही. या सर्व प्रकारामुळे एसटीचे वाहक ड्युटी बजावताना कमालीचे त्रस्त झालेले दिसत आहेत. इलेक्ट्रॉनिक मशिनमध्ये अचानक बिघाड होऊ शकतो. अशावेळी वाहकाजवळ ट्रे दिलेला असतो. त्याने जुन्या पध्दतीचे तिकीट पंचकरून देणे गरजेचे आहे. तसेच मशिन दुरूस्तीसाठी प्रत्येक डेपोला कंपनीचा कारागीर आहे. मशिन नादुरस्त झाल्यास त्या दुरूस्त करण्याची कंपनीची जबाबदारी असल्याचे बुलडाणा आगार व्यवस्थापक किरण कुमार भोसले यांनी सांगीतले.