‘इटीआयएम’मुळे वैतागले एस.टी. वाहक
By Admin | Updated: September 5, 2014 00:19 IST2014-09-05T00:19:44+5:302014-09-05T00:19:44+5:30
इलेक्ट्रॉनिक तिकीट इश्यू मशीन उपलब्ध नियमित देखभाल अभावी त्रासदायक ठरत आहेत.

‘इटीआयएम’मुळे वैतागले एस.टी. वाहक
बुलडाणा : आधुनिकतेची कास धरीत एसटी महामंडळाने वाहकांना तिकीट देण्यासाठी इलेक्ट्रॉनिक तिकीट इश्यू मशीन उपलब्ध करून दिल्या. परंतु या मशिनची नियमित देखभाल होत नसल्याने प्रवासात मशीन बंद पडणे, तिकिटाची रक्कम नीट न उमटणे, बसमध्ये चाजिर्ंग उपलब्ध नसणे ह्या समस्या वाहकांना भेडसावत आहेत. यामुळे प्रवासी वाहकांशी वाद घालतात. बरेचवेळा या तिकीटावर पैसे नीट न उमटल्यामुळे हाताने रक्कम लिहून दिल्यास मार्ग तपासणी पथकाचे अधिकारी अशा वाहकावर कारवाई करतात, अशा दुहेरी संकटाचा सामना वाहकांना करावा लागत आहे. एसटीचे वाहक पूर्वी प्रवाशांना ट्रेमधील तिकीट काढून ते पंच करून देत होते. कालांतराने महामंडळाने वाहकांना ह्यईटीआयएमह्ण उपलब्ध करून दिल्या. बुलडाणा विभागात ट्रायमॅक्स कंपनीच्या एकूण ७५४ ह्यईटीआयएमह्ण कार्यरत आहेत. काही काळ ह्या मशिन्स चांगल्या चालल्या. परंतु त्यानंतर या मशिन्सची नियमित देखभाल होत नसल्यामुळे यात तांत्रिक बिघाड होण्याचे प्रमाण वाढले आहेत. ही मशीन बरेचवेळा पूर्णपणे चाजिर्ंग केलेली नसते. त्यामुळे ऐन कामाच्या वेळी मशीन बंद पडते. तिकीटासाठी वारलेल्या कागदाची क्वॉलिटी सुध्दा निकृष्ट असल्यामुळे प्रिंट देताना कागद अडकून एकाच ठिकाणी प्रिंट होते. त्यामुळे प्रवासी वाहकांशी वाद घालतात. काही मशीन मध्ये विविध प्रकारच्या सवलतीच्या पासेसची नोंदही अनेकदा होत नाही. या सर्व प्रकारामुळे एसटीचे वाहक ड्युटी बजावताना कमालीचे त्रस्त झालेले दिसत आहेत.
इलेक्ट्रॉनिक मशिनमध्ये अचानक बिघाड होऊ शकतो. अशावेळी वाहकाजवळ ट्रे दिलेला असतो. त्याने जुन्या पध्दतीचे तिकीट पंचकरून देणे गरजेचे आहे. तसेच मशिन दुरूस्तीसाठी प्रत्येक डेपोला कंपनीचा कारागीर आहे. मशिन नादुरस्त झाल्यास त्या दुरूस्त करण्याची कंपनीची जबाबदारी असल्याचे बुलडाणा आगार व्यवस्थापक किरण कुमार भोसले यांनी सांगीतले.