अंतराळयात्री सुनीता विल्यम्स ‘डिजीटल शो’

By Admin | Updated: July 3, 2014 22:56 IST2014-07-03T21:12:33+5:302014-07-03T22:56:47+5:30

लोकमत बाल विकास मंच सदस्यांसाठी आयोजन

Astronaut Sunita Williams 'Digital Show' | अंतराळयात्री सुनीता विल्यम्स ‘डिजीटल शो’

अंतराळयात्री सुनीता विल्यम्स ‘डिजीटल शो’

खामगाव : सुनीता विल्यम्स हिने अवकाशातील सहा महिन्यांच्या वास्तव्यात संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. भारतीय वंशाच्या या अमेरिकन स्त्रीने अंतराळात स्पेसवॉक करुन अवकाश प्रवासात विक्रमी नोंद केली आहे. तिचा हा थक्क करुन सोडणारा अवकाश प्रवास बालगोपालांना प्रत्यक्ष बघता यावा या अनुषंगाने लोकमत बालविकास मंच तर्फे प्रसिध्द व्यंगचित्रकार प्रा. विवेक मेहेत्रे प्रस्तुत ह्यप्रेरणादायी अंतराळयात्री सुनीता विल्यम्सह्ण या डिजीटल शो चे आयोजन बुलडाणा व खामगाव येथे करण्यात आले आहे. बुलडाणा येथे शनिवार ५ जुलै रोजी दुपारी ३.३0 वाजता गर्दे वाचनालय व खामगाव येथे रविवार ६ जुलै रोजी दुपारी ४ वा. कोल्हटकर स्मारक, केला हिंदी शाळेच्या मागे येथे या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात प्रा.विवेक मेहेत्रे विद्यार्थ्यांना सुनीता विल्यम्सचे बालपण, अंतराळातील तिचे विक्रम व स्पेसवॉक करताना तिने अवलंबलेले तंत्र याबद्दल पुरेपूर माहिती देणार आहेत. तर मग काय येताय नं तुमच्या सच्चा सवंगडी बालविकास मंच सोबत सुनीता विल्यम्सचा हा अनोखा अंतरिक्ष प्रवास बघायला.
कार्यक्रमाला फक्त बालविकास मंच सदस्यांना प्रवेश असेल. सोबत सदस्यता ओळखपत्र आणणे आवश्यक आहे. अधिक माहितीकरिता बालविकास मंच संयोजक योगेश पाटील ९९७0४५७७६0 यांच्याशी संपर्क साधावा.

Web Title: Astronaut Sunita Williams 'Digital Show'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.